व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute : ‘भारतीय संविधान’, ‘धम्म साहित्य’...

Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute : ‘भारतीय संविधान’, ‘धम्म साहित्य’ ग्रंथांचा बार्टीमध्ये अपमान

Demand for Action Against Those Insulting the ‘Indian Constitution’ and ‘Dhamma Literature’ : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित आघाडीची मागणी

Akola डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), पुणे येथे भारतीय संविधान आणि राष्ट्रपुरुषांच्या साहित्याची विटंबना झाल्याच्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर देशद्रोहासह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी राज्यपाल, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे केली आहे.

राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, बार्टी संस्थेमध्ये भारतीय संविधान, प्रास्ताविका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, धम्म साहित्य आणि त्यांच्या प्रतिमांसह असलेली पुस्तके शासकीय निधीतून प्रकाशित करण्यात आली. मात्र, ही सर्व पुस्तके सहा महिन्यांहून अधिक काळ उघड्यावर ठेवण्यात आली होती. पावसामुळे ती पूर्णतः भिजून खराब झाली असून, हे कृत्य म्हणजे संविधान आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

List of Excess Rainfall-Affected Talukas Released : जिल्ह्यातील ९ तालुक्यांना लागू हाेणार दुष्काळी सवलती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार

या संदर्भात पातोडे म्हणाले, “राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ अंतर्गत संविधान, राष्ट्रीय प्रतीके किंवा राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे हे गंभीर अपराध आहे. या कायद्याच्या कलम २ नुसार अशा कृत्यांसाठी तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद आहे.”*

तसेच त्यांनी नमूद केले की, या घटनेत भारतीय संविधानाचा आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान करून समाजात धार्मिक आणि सामाजिक वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ए (वर्ग, धर्म, जात यांच्या आधारावर वैमनस्य पसरविणे) आणि कलम २९५ए (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गतही गुन्हा दाखल केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.

Khadakpurna Project : ठेका मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेत जोडली ५ बनावट प्रमाणपत्रे

दरम्यान, पुणे पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असली तरी, अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. पोलिस आयुक्तांनी “प्राथमिक चौकशीसाठी वेळ हवा आहे” असे सांगितल्याचे समजते. याबाबत पातोडे यांनी “सर्वोच्च न्यायालयाच्या ‘ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार’ या ऐतिहासिक निकालानुसार, जर माहिती दखलपात्र गुन्ह्याशी संबंधित असेल तर तत्काळ एफआयआर नोंदविणे बंधनकारक आहे. तरीही पुणे पोलिस कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Congress Tractor March : ‘सरकार झोपेत आहे; आम्ही शेतकऱ्यांचा आवाज थांबू देणार नाही’

वंचित बहुजन युवा आघाडीने पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!