Pravin Tayade : बच्चू कडूंनी सत्तेत असताना बंगला बांधला, कारखाना उभारला

Bachchu Kadu Accused of Building a Luxurious Bungalow While in Power : भाजप आमदाराने साधला निशाणा, आलिशान फार्महाऊस बांधल्याचाही आरोप

Amravati शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागपुरात ‘महाएल्गार’ आंदोलन पुकारणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

बच्चू कडूंनी सत्तेच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर करून अमरावती जिल्ह्यात टुमदार बंगला, फार्महाऊस, कारखाना उभारल्याचा तसेच मुंबई, नागपूरसह इतर शहरांमध्ये मालमत्ता गोळा केल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे. त्यांच्या संपूर्ण मालमत्तांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Bacchu Kadu : तर शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान करू नये

तायडे म्हणाले की, “बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली. या मालमत्तेचा स्रोत काय, आणि ज्या व्यक्तींच्या नावाने ती नोंदवली, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.”

दरम्यान, बच्चू कडू यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांनी हवे असल्यास माझी ईडीमार्फत चौकशी करावी, आणि दोषी आढळल्यास तुरुंगात डांबावे,” असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, “विरोधकांचे काम म्हणजे आरोप करणे. पण जनता सर्वकाही जाणते.”

प्रवीण तायडे यांनी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोघांमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. गेल्या वर्षी बहिरम यात्रेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता.

Local Body Elections : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होणार!

अलीकडेच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ‘आमदारांना कापा’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरही तायडे यांनी टीका करत, “बच्चू कडू यांनी माझ्या घरी येऊन दाखवावे,” असे आव्हान दिले होते. “सत्तेत असताना शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता, आता तो अचानक का आला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.