Local Body Elections : भाजपला चिमूरमधून मोठा धक्का, बंटी भांगडियांचे कट्टर समर्थक जुनेद खान यांचा राजीनामा !

BJP suffers a big blow from Chimur, Junaid Khan, a staunch supporter of Bunty Bhangadia, resigns : अल्पसंख्यांक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदाचाही दिला राजीनामा, उद्या काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

Nagpur : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलतापालतीचे संकेत मिळत आहेत. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आणि चिमूरचे आमदार भाजप नेते बंटी भांगडिया यांचे जवळचे मानले जाणारे जुनेद खान यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यावेळी सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ते उद्या (१३ नोव्हेंबर) मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या घडामोडीमुळे केवळ चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील भाजपचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुनेद खान हे गेली अनेक वर्षे बंटी भांगडिया यांचे विश्वासू आणि निकटम कार्यकर्ते आणि भाजपचे सक्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अल्पसंख्याक समाजात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या राजीनामाने भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चात मोठी नाराजी निर्माण झाली. भाजपच्या प्रदेश नेतृत्वालाही ही घडामोडी धक्का देणारे ठरली आहे. पक्षातील नाराज नेत्यांची संख्या वाढत असल्याचे यामुळे संकेत मिळत आहेत.

Party symbol controversy : शिवसेना – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद पुढे ढकलला

काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय का?
सत्ताधारी भाजपच्या धोरणावर नाराजी आणि स्थानिक नेतृत्वाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने जुनेद खान नाराज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे भोवले. संघटनेतील एकाधिकारशाही आणि गटबाजी ही त्यांच्या राजीनामाच्या मागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. जुनेद खान उद्या मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात नवीन उभारी मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

विदर्भाच्या राजकारणाची समीकरणे बदलणार..
चिमूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पक्षातीलच प्रमुख नेत्याच्या काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय मानले जाणारे बंटी भांगडिया यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडीमुळे चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मतदारांमध्ये भाजपची पकड सैल होऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. भाजपच्या संघटनेमध्ये असंतोष वाढत असताना काँग्रेस मात्र नव्या चेहऱ्यांच्या माध्यमातून स्वतःला पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट चित्र आज दिसत आहे. जुनेद खान यांचा काँग्रेस प्रवेश हा या नव्या राजकीय समीकरणांचा निर्णायक टप्पा ठरू शकतो.