Decision due to lack of cooperation from party, big stir in politics : पक्षाकडून सहकार्य न मिळाल्याने निर्णय, राजकारणात मोठी खळबळ
Latur : रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोठ्या संकटात सापडला आहे. पक्षाने दिलेल्या 16 उमेदवारांपैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, ते तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली आहे. पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार करत या उमेदवारांनी थेट नाराजी व्यक्त केल्याने ठाकरे गटाची निवडणूक मोहीम ढवळून निघाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
2016 मध्ये स्थापन झालेल्या या नगरपंचायतीत 2017 च्या पहिल्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर तीन वर्ष प्रशासकाचा कालावधी गेला. सध्याच्या निवडणुकीत चौरंगी लढत निर्माण झाली असून भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी मुख्य लढत अपेक्षित होती. मात्र ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांच्या अचानक माघारीमुळे निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची आखणी होत आहे. या मोठ्या संख्येतील माघारीमुळे रेणापूरची राजकीय परिस्थिती एका क्षणातच बदलली आहे.
दरम्यान, या घडामोडींमध्ये काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांचे नावही चर्चेत आहे. विरोधकांच्या आरोपानुसार, भाजपाला थेट आव्हान देण्यासाठी काँग्रेसनेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कमकुवत केले असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर दबाव टाकून उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यात आली, अशीही चर्चा रंगत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या पसाऱ्यात मोठे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत. चौरंगी लढतीत आता कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसणार, याची गणिते नव्याने मांडली जात आहेत.
Local body election : शरद पवार गटाच्या खासदारांच्या वक्तव्यामुळे खळबळ
लातूरमधील राजकीय घडामोडींना आणखी वेग देणारी घटना म्हणजे अहमदपूर नगरपरिषदेतील वाद. येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी ‘गद्दारांना क्षमा नाही,’ असे विधान करत युतीतील तणाव उघड केला. जिल्ह्यातील भाजप आमदार आता एकत्र येत मंत्री पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Gauri Palve suicide case : पंकजा मुंडेंचे पीए अखेर पोलिसांसमोर हजर
रेणापूरमधील शिवसेनेच्या 11 उमेदवारांच्या माघारीनंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असून, ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या घडामोडींचा संपूर्ण निवडणूक रणांगणावर काय परिणाम होतो, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
_______








