व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uday Samant : मंत्री उदय सामंत शिंदे गटाला रामराम ठोकणार?

Uday Samant : मंत्री उदय सामंत शिंदे गटाला रामराम ठोकणार?

Thackeray groups big claim; bombardment of allegations and counter-allegations : ठाकरे गटाचा मोठा दावा; आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार

Mumbai : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीवरून निर्माण झालेल्या वादात आता राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना लक्ष्य करून केलेल्या सवालांनंतर अंधारे यांनी थेट पलटवार करत सामंत यांच्याच राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये सुषमा अंधारे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यात अनौपचारिक भेट झाली होती. ही भेट योगायोगाने झाल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले असून, याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न उदय सामंत करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चहा घेत असताना समोर बसलेली व्यक्ती संवाद साधते, तेवढी तरी संस्कृती आपल्याकडे आहे, असे म्हणत त्यांनी सामंत यांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले.

Local body election : शरद पवार गटाच्या खासदारांच्या वक्तव्यामुळे खळबळ

अंधारे यांनी पुढे बोलताना सामंत यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, सहज घडलेल्या भेटीला वादाचा रंग देण्यात आला, म्हणजेच सामंत यांच्या दुखऱ्या नसेवरच घाव बसला असावा. त्यांच्या मते, उदय सामंत उपमुख्यमंत्री होण्याच्या मनसुबे बाळगत आहेत आणि त्यांच्या त्या मनसुब्यावरच आपल्या वक्तव्याने मी पाणी फेरले, असा टोला त्यांनी लगावला. “उदय भाऊ, तुमच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला मला बहिणीप्रमाणे बोलवा,” असे म्हणत त्यांनी या वादाचा सूर आणखी तीव्र केला.

Gauri Palve suicide case : पंकजा मुंडेंचे पीए अखेर पोलिसांसमोर हजर

अंधारे यांनी यापुढे उदय सामंत यांच्या राजकीय स्थैर्यावर उपरोधिक टिप्पणी करत म्हटले की, आता तुम्ही तिथूनही फुटण्याच्या तयारीत आहात का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मी केलेले भाष्य तुमच्या फार जिव्हारी लागले, हे तुमच्या प्रतिक्रियेतून दिसते, असे म्हणत त्यांनी सामंत यांना थेट टोला दिला.

Maharashtra politics : न बोलण्यासारखं काहीही घडलं नाही, वेड्यांचा बाजार सुरु आहे

दरम्यान, उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा आणि दिल्लीतील भेटीसंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या आरोप-प्रत्यारोपानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला असून, उदय सामंत खरंच शिंदे गटाला रामराम करणार का, यावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

_____

error: Content is protected !!