Krantikari Shetkari Sanghatna : २१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित

21,000 farmers deprived of crop insurance : क्रांतिकारी शेतकरी संघटनेची दुचाकी रॅली, विम्याचा लाभ देण्याची मागणी

Buldhana क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रलंबित पिकविमा तात्काळ मिळावा यासाठी मलकापूर ते बुलढाणा अशी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात पोहोचताच अमोल मोरे व सहकाऱ्यांनी मलकापूर येथील शेतकऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, खरीप हंगाम २०२४ मध्ये मलकापूर तालुक्यातील तब्बल २७ हजार शेतकऱ्यांचा पिकविमा मंजूर झाला असतानाही, आतापर्यंत केवळ ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच विम्याची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित सुमारे २१ हजार शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असून, हा तालुक्यावरील गंभीर अन्याय असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना सुरक्षित

पिकविमा रक्कम अनेक महिन्यांपासून रखडली असून विमा कंपन्यांची आश्वासने, प्रणालीतील विलंब आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. इतर तालुक्यांत ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांना विमा मिळाल्याचे उदाहरण देत, मलकापूरातील फक्त २० टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची बाब संघटनेने अधोरेखित केली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवा नेते सचिन शिंगोटे यांनी पिकविम्यावरील विलंबाबाबत तीव्र आक्षेप नोंदवून कृषी अधीक्षकांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले. वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळावा, अशी नम्र मागणी निवेदनातून करण्यात आली.

Devendra Fadnavis : नवनित राणांना पुन्हा संसदेत जाण्याची इच्छा

या रॅलीत सचिन शिंगोटे, अमोल मोरे, महेंद्र जाधव, आकाश माळोदे, पवन काकडे, आमिन खासाब, सचिन खंडारे, राजू गवळी यांच्यासह मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी व क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पिकविम्याची रक्कम त्वरित न मिळाल्यास रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.