Vaibhav Ghuge Suicide : राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्याने आर्थिक विवंचनेतून संपविले जीवन

A student leader of the NCP ended his life due to financial distress : दिग्गज नेत्याचे निकटवर्तीय, विद्यार्थी आघाडीच्या महानगरप्रमुखपदाची होती जबाबदारी

Akola राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे महानगरप्रमुख वैभव घुगे यांचा रेल्वेखाली आढळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली, तरी अंतिम कारण पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे.

ही घटना जुन्या आरटीओ रोड परिसरातील रेल्वे रुळांवर घडली. रेल्वे अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच

घुगे हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. शिक्षण क्षेत्रात आणि विद्यार्थ्यांमध्ये ते सक्रिय होते. काही दिवसांपासून ते पक्षाच्या कामात फारसे दिसत नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम म्हणाले, “वैभवशी ५-६ दिवसांपूर्वीच फोनवर बोलणे झाले. ते पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा अचानक झालेला मृत्यू मनाला मोठा धक्का देणारा आहे. पोलिस तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील. लवकरच अकोल्यात येऊन कुटुंबीयांची भेट घेणार आहोत.”

Local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश

बुधवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अकोट येथे सभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षातील पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरात विविध विद्यार्थी संघटना व आघाड्यांमधून राजकारणात येणाऱ्यांची संख्या वाढत असताना ही घटना सर्वांना चटका लावणारी ठरली आहे.