Local Body Elections : विचित्र आघाड्या आणि २०० अपक्ष उमेदवार!

Only the last three days of campaigning remain : फक्त तीन दिवसांची रणधुमाळी उरली; अनेक ठिकाणी उलटफेर होण्याची शक्यता

Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), काँग्रेसचे पडलेले गट आणि स्थानिक आघाड्यांमुळे रिंगण तापले असून, यंदाची निवडणूक प्रमुख पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यातच नगराध्यक्षपदासाठी तब्बल ३० अपक्ष आणि सदस्यपदासाठी २०० अपक्ष उभे राहिल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित वळणे आणि उलटफेर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

११ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी ८७ उमेदवार तर सदस्यपदासाठी ११८१ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील ४,७७,०८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विचित्र आघाड्या आणि कमी मतदानामुळे उलटफेर शक्य आहे. जिल्ह्यात अनेक पालिकांमध्ये पारंपरिक पक्षांमधील विचित्र आघाड्या दिसत आहेत.बुलढाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, जळगाव जामोद आणि मलकापूरमधील हायप्रोफाईल लढतींमध्ये अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Vaibhav Ghuge Suicide : राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्याने आर्थिक विवंचनेतून संपविले जीवन

जळगाव जामोदमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी दिलेल्या समर्थनामुळे दुरंगी लढत अचानक त्रिकोणी झाली आहे. अशा प्रकारचे समीकरण अनेक पालिकांमध्ये दिसत आहे.

लोणार: चौरंगी लढत
देऊळगाव राजा, सिंदखेड राजा: आघाड्यांमुळे राजकारण तापले
नांदुरा: भाजप विरुद्ध नगरविकास आघाडी अशी सरळ लढत
खामगाव: कामगार मंत्री आकाश फुंडकर व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यात प्रतिष्ठेची लढत
चिखली: तिरंगी लढतीला नवे वळण
बुलढाणा: तिरंगी लढत दिवसेंदिवस रंगत आहे.

पालिकानिहाय अपक्ष उमेदवारांची संख्या
नगरपालिका नगराध्यक्ष सदस्य
बुलढाणा 1 15
चिखली 7 21
देऊळगाव राजा – 12
जळगाव जामोद 1 13
खामगाव – 26
लोणार 2 17
मलकापूर – 37
मेहकर 1 13
नांदुरा – 21
शेगाव 6 21
सिंदखेड राजा 2 4
एकूण 30 200

३० नोव्हेंबरला प्रचार थांबणार असून उमेदवारांसाठी आता फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अपक्षांना संघटनात्मक अडचणी असल्या तरी काही ठिकाणी त्यांची कामगिरी उलटफेर करणारी ठरू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच

बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पाचपेक्षा जास्त सभा घेतल्या. यापूर्वी चिखलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे वातावरण अधिक तापले होते. २९ नोव्हेंबर रोजीही फडणवीस बुलढाण्यात सभा घेणार असल्याने राजकीय तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण हे मेहकरमध्ये सभा घेणार आहेत.