Girish mahajan reply to sayaji shinde
: गिरीश महाजनांचा सयाजी शिंदेंना प्रतिउत्तर; साधूग्राम, झाडतोड
Nashik: नाशिकच्या तपोवन परिसरातील साधूग्रामसाठी झाडतोडीचा मुद्दा तापलेला असताना अभिनेता सयाजी शिंदे यांच्या विधानानंतर मंत्री गिरीश महाजनांनी थेट उत्तर देत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे. “गिरीश महाजन उत्तर द्या, तुमच्याशी दुश्मनी झाली तरी काही फरक पडत नाही,” असे सयाजी शिंदे यांनी म्हटल्यावर गिरीश महाजन म्हणाले, “आम्ही कुणाशी भांडायला आलो नाही. सयाजी शिंदे यांच्या समाधान झाल्यानंतरच झाडं लावू. आधी झाडं लावू, मग त्यांनी सांगावं काय बरोबर आणि काय चूक. आम्ही एखाद्या गोष्टीवर ‘करून टाकलं’ असं म्हणणाऱ्यांपैकी नाही.”
सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यासाठी साधूग्राम क्षेत्र नाशिकच्या तपोवनमध्ये राखीव ठेवण्यात आलं आहे. या भागात झाडं तोडण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक सामोरे आले असतानाच महाजन यांनी आपल्या भूमिकेत ठामपणे म्हटलं की, “ही जागा साधूग्रामसाठीच आहे, कोणाच्या घशात घालण्याचा प्रश्नच नाही. कुंभमेळा बारा वर्षांतून एकदाच येतो. राईचा पर्वत करू नका. वृक्षप्रेमी आलेत, त्यांनी राग व्यक्त केला पण सरकारची भूमिका स्पष्ट आहे, आम्हीही वृक्षप्रेमी आहोत.”
Local body election : आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे !
पुढे झाडतोडीची आकडेवारी देत त्यांनी सांगितलं, “काही झाडं काढणार आहोत, पण एका झाडाला दहा झाडं लावणार. हजार झाडं काढणार आहोत, पण त्याच्या बदल्यात १५ हजार झाडं लावली जातील. झाडे लावण्याचे काम सुरू झालं आहे आणि हैदराबादवरूनही झाडं आणली जातील. झाडं तोडून रेस्टॉरंट बांधण्याचा प्रश्नच नाही.”
याच वेळी प्रलंबित राजकीय विषयांवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांनाही महाजनांनी स्पष्ट उत्तरं दिली. विजय केनवडेकर यांच्यावर झालेल्या आर्थिक प्रकरणात त्यांनी म्हटलं, “केनवडेकरांनी स्पष्ट सांगितलं आहे ते पैसे व्यवसायाचे होते. तो प्रकार ट्रॅप होता. केनवडेकर निवडणूक आयोगासमोर स्पष्टीकरण देणार आहेत. ज्या ठिकाणी महायुती नाही तिथे केसरकर आवाहन करत असतील. कोणाच्या तोंडाला बंधन लावता येत नाही.”
Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
नारायण राणे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चेलाही गिरीश महाजनांनी पूर्णविराम दिला. “राणेसाहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी केंद्रातही काम केलंय. ते भाजपबद्दलच बोलतात. कुठेही त्यांना संपवण्याचे काम होत नाही. त्यांची मुलं मोठी झाली हे खरं आहे, पण ते प्रत्येक पक्ष बैठकीला हजर असतात. एखाद्या ठिकाणी आले नसतील तर त्याचा अर्थ नाराजी होत नाही. त्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय असे समजण्याचे कारण नाही,” असे महाजनांनी सांगितले.
सयाजी शिंदे, वृक्षतोड, साधूग्राम आणि राणेंवरील आरोप यामुळे सध्या नाशिकचं राजकीय वातावरण तापलेलं असलं तरी गिरीश महाजनांच्या उत्तरांनंतर पुढील घडामोडी कशा घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____








