व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vanchit Bahujan Aghadi : खुले नाट्यगृह विकासासाठी १० कोटींच्या निधीची मागणी

Vanchit Bahujan Aghadi : खुले नाट्यगृह विकासासाठी १० कोटींच्या निधीची मागणी

demand for a fund of ₹10 crore for the development of an open-air theatre : वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक नीलेश देव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन**

Akola शहरातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह’ विकासकामासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे १० कोटी रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक नीलेश रामकृष्ण देव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली.

दिलेल्या निवेदनात ३१ ऑगस्ट २०१५ ते १९ ऑगस्ट २०१६ दरम्यान विविध शासकीय कार्यालयांमधून झालेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देत खुले नाट्यगृह विकासासाठी मंजूर झालेला निधी योग्य फॉलो-अपअभावी अव्ययित राहिला, असे नमूद करण्यात आले आहे.

२०१६ मधील जिल्हा वार्षिक योजनेतील प्राथमिक मंजुरी, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय कार्यालये तसेच तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पत्रांचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar : माझा शेतकरी महत्त्वाचा म्हणत मुनगंटीवार विधानसभेत गरजले..

२०१३ साली करण्यात आलेल्या ५० लाखांच्या तात्पुरत्या दुरुस्तीव्यतिरिक्त गेल्या जवळपास दशकभरात या नाट्यगृहाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्यात उभारलेले हे एकमेव खुले नाट्यगृह असल्याने, राज्याच्या सांस्कृतिक धोरणानुसार या प्रकल्पाला ‘प्राथमिकता श्रेणी’ द्यावी, अशी मागणी देव यांनी केली आहे.

नाट्यगृहातील सीनिक डिझाइन, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था, इलेक्ट्रिकल नेटवर्क, ड्रेनेज, प्रेक्षक आसनव्यवस्था आणि सुरक्षा मानकांची पूर्तता अशा महत्त्वाच्या घटकांमध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या तत्कालीन गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी स्वखर्चाने तयार करून मनपा व जिल्हा प्रशासनाला सादर केलेला संपूर्ण तांत्रिक ब्ल्यूप्रिंट अधिकृत नोंदीत उपलब्ध आहे.

या आराखड्यात तांत्रिक सुधारणा, आसनव्यवस्थेचे उन्नतीकरण, सुरक्षा मानकांचे पालन, आधुनिक प्रकाश व ध्वनीव्यवस्था, आपत्कालीन प्रणाली आणि आवश्यक पूरक सुविधा यांचा समावेश आहे.

Anna Hazare : अखेर अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणावर !

निवेदनानुसार, आजवर या कोणत्याही घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि नाट्य उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे हे नाट्यगृह वापरण्यास अडथळे निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!