Ajit Pawar : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्रावर शोककळा!

Deputy Chief Minister’s aircraft meets with a serious accident in Baramati : बारामतीत भीषण अपघात; ‘लँडिंग’ दरम्यान तांत्रिक बिघाड

Baramati राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. डीजीसीएने विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी ते जात होते. सकाळी साधारण ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमानाचे ‘क्रॅश लँडिंग’ झाले. हे विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले. विमान जमिनीवर आदळताच त्याला आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

Protest against Anjali Bharti : अमृता फडणवीस यांच्याबद्दलच्या विधानावरून गदारोळ; सर्वच राजकीय पक्षांकडून अंजली भारतींचा निषेध

विमान कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विमानात अडकलेल्या अजित पवारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक वृत्तानुसार, अजित पवारांना या अपघातात गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, डीजीसीएने विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.

विमान अपघातात पूर्णपणे जळून खाक झाले असून, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.