Thackeray’s MLA remains silent on casteist remarks by Congress corporators : भाजपचा सवाल, उबाठा-काँग्रेस-वंचित आघाडीवर हल्ला
Akola काचेच्या घरात राहणारे आणि वारंवार भूमिका बदलणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जातीवरून केलेल्या वक्तव्यांवर मौन का बाळगले, असा सवाल भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी उपस्थित केला. तसेच राजेश्वर मंदिरावर हल्ला करणाऱ्यांसोबत हेच नेते कसे बसले, आणि त्यांच्या उमेदवारांना बहुसंख्य समाजाने मतदान केले नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
साम, भेद, दंड आणि जातीय राजकारण करूनही महापौरपद मिळवता आले नाही, याकडे लक्ष वेधत मसने म्हणाले की, “वंचित आघाडीसोबत कधीही जाणार नाही,” असे सांगणारे नेते आज त्यांच्यासोबत कसे बसले, याचे उत्तर त्यांनी आत्मचिंतनातून द्यावे. स्वतःला हिंदू म्हणवणारे नगरसेवक जातीवादी लोकांसोबत बसतात, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Mahayuti government: जिल्ह्यातील नऊ आमदारांना विकासकामांसाठी मिळाले २७ कोटी
महानगराच्या विकासासाठी काही नगरसेवकांनी भाजपाला मतदान केले. त्या नगरसेवकांचा तसेच त्यांच्या मतदारांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान असून, संविधान न मानणारे आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना न जुमानणारे नेते लोकशाहीसाठी घातक आहेत, असा आरोप मसने यांनी केला. अकोलेकर आणि राजराजेश्वर नगरीच्या विकासासाठी ‘शहर सुधार आघाडी’ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घोडेबाजार झाला नाही का, विविध आमिषे दाखवली गेली नाहीत का, आघाडी का करण्यात आली नाही, तसेच वेगवेगळे गट कसे निर्माण झाले, असे प्रश्न उपस्थित करत मसने म्हणाले की, काचेच्या घरात राहून दुसऱ्यांकडे बोट दाखवणाऱ्यांकडेही चार बोटे दाखवली जाऊ शकतात.
Mahayuti government : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी हवेत 837 कोटी!
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जय–पराजयामुळे खचून न जाता सातत्याने काम करतो. विजय मिळाल्यानंतर अधिक जबाबदारीने काम करण्याची भूमिका भाजप घेतो, याचे उदाहरण आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या कृतीतून दिले आहे. ते आपल्या मतदारसंघासह महानगर आणि जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहून जनतेत मिसळतात. सर्किट हाऊसपुरते राजकारण न करता जनतेच्या सुख-दुःखात सहभागी राहणारे भाजपचे लोकप्रतिनिधी असल्यामुळेच जनतेचा विश्वास भाजपावर कायम असल्याचे मसने यांनी सांगितले.








