devendra-fadnavis-cancels-zilla-parishad-election-campaign-after-ajit-pawar-accident : अजित पवार यांच्याबाबत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Mumbai : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम टप्प्यातील प्रचारसभा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेमुळे राज्यात निर्माण झालेल्या संवेदनशील वातावरणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी प्रचाराची अंतिम मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात आली आहे. या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सात दिवसांत सुमारे 22 प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री स्वतः कोणत्याही प्रचारसभेला उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा रद्द झाल्या असल्या तरी स्थानिक पातळीवरील नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणार आहेत. पक्ष संघटनेच्या माध्यमातून प्रचार सुरू राहणार असून स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Mahayuti government : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी हवेत 837 कोटी!
दरम्यान, अजित पवार यांच्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यात शोकाकुल वातावरण असून सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यक्रमांना मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत असून, निवडणूक प्रचारातही संयम पाळण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतल्याचे चित्र आहे.








