Union Budget 2026 : हा अर्थसंकल्प जनतेसाठी नव्हे, तर उद्योगपतींसाठी, ठाकरे गटाकडून निषेध

Shivsena-ubt-condemns-union-budget-2026-corporate-friendly-not-for-common-man : महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार अपयशी; शिवसेनेची घणाघाती टीका

Buldhana केंद्र सरकारने सादर केलेला सन २०२६ चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असून, तो केवळ मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठीच आखण्यात आला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न यांसारख्या मूलभूत विषयांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेनेने या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध केला आहे.

शिवसेनेने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असताना, या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. रोजगारनिर्मितीसाठी केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात नोकऱ्या कशा निर्माण होणार, याची कोणतीही स्पष्ट योजना या अर्थसंकल्पात दिसत नाही.

Negligence of the supply department : मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशनच्या धान्यापासून वंचित!

शेतकरी प्रश्नांवर भाष्य करताना शिवसेनेने या अर्थसंकल्पाला ‘शेतकरीविरोधी’ म्हटले आहे. कर्जमाफी, हमीभाव आणि उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याबाबत कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला पुरेसा निधी न देता सरकार खासगीकरणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेवर आर्थिक ओझे वाढणार असल्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

Sudhir Mungantiwar : भुरसे कुटुंब गहिवरले, म्हणाले सुधीरभाऊ आपल्या सहकार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाही..

हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांचा विकास नसून तो केवळ कॉर्पोरेट क्षेत्राला बळ देणारा आहे. शेतकरी, कामगार, युवक आणि महिला यांसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या हिताकडे सरकारने पूर्णतः पाठ फिरवली आहे. “हा अर्थसंकल्प म्हणजे ‘कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’ आहे,” अशा शब्दांत शिवसेनेने केंद्राच्या धोरणांचा धिक्कार केला आहे.