NCP Ajit Pawar : दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भडकले; संजय राऊत लफंगा व सुपारीबाज नेता

NCP leader attacks sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातूनही त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे, नेत्याचा मोठा दावा

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. हा अपघात की घातपात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनीसुद्धा दादांचा घात झाला अशी शंका व्यक्त केली आहे. पूर्व विदर्भातील एक बडा नेता त्यांना सर्वात शेवटी भेटायला आला होता. त्यामुळे दादांना बारामतीला विमानाने जावे आले असेही ते म्हणाले होते.

त्यानंतर संजय राऊत यांनी विदर्भातील तो बडा नेता कोण? त्याचे नाव उघड करावे अशी मागणी करताना प्रफुल पटेल यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले आहेत.

Sudhir Mungantiwar : प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी बदलण्याचा अधिकार जोरगेवारांना कुणी दिला?

पक्षाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते प्रशांत पवार यांनी संजय राऊत यांच्यावर लफंगा आणि सुपारी घेऊन बोलणारा नेता अशा शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल चढवला.

संजय राऊत यांना कोणी विचारत नाही. त्यांच्या पक्षात त्यांची इज्जत नाही. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातूनही त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे. ते रोज सकाळी उठून अकलेचे तारे तोडत असतात. आपण किती महत्त्वाचे नेते आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी पुरावे सादर करावे, अन्यथा माफी मागावी अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला चंद्रपूरच्या विकासाचा ‘फाइव्ह इयर प्लॅन’!

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असले तर ते खपवून घेतले जाणार नाही. मागचे पुढचे काही माहीत नसताना केवळ मीडियावर चर्चेत राहण्यासाठी ते बोलत आहेत. रोहित पवार यांनी कोणाचे नाव घेतले नाही. ते पवार कुटुंबातील आहेत. मात्र संजय राऊत यांचा काही संबंध नाही. आजवर त्यांनी अनेकांवर शेकडो आरोप केलेत. मात्र एकदाही पुरावा सादर केला नाही. त्यांची जोकर यांच्यात गणना केली जाते. हिंमत असेल तर त्यांनी विदर्भात येऊन विदर्भातील आमच्या नेत्यांवर आरोप करून दाखवावे असेही आव्हान त्यांनी संजय राऊत यांना दिले.