High Court Judge : ‘सर्वांसाठी न्याय’ हे ब्रीद सार्थ करा !

Make the motto ‘Justice for All’ worthwhile : न्या. अनिल किलोर यांचे आवाहन, तळागाळापर्यंत पोहोचा

Akola ‘भारतीय संविधानाने दिलेले समान हक्क आणि अधिकार हे फक्त संविधानापुरते मर्यादित न राहता शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचायला हवे. न्यायापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी ‘सर्वांसाठी न्याय’ हे ब्रीद खऱ्या अर्थाने पूर्ण होईल,’ असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पातुर तालुक्यातील चान्नी येथे शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बार कॉन्सिलचे सदस्य अॅड. मोतीसिंग मोहता, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. हेमंत मोहता, न्यायाधीश कैलास कुरंदळे, तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रवीकुमार खांबलकर आदी उपस्थित होते.

Rape crimes decreased, but concern remains : बलात्काराचे गुन्हे घटले, पण चिंता कायम !

महामेळाव्यात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. न्यायालयापर्यंत येण्याची गरज कमी करण्यावर भर असायला हवा, असंही न्या. किलोर म्हणाले. ‘गावांमधील भांडण-तंटे गावातच सोडवले जावेत. जेणेकरून नागरिकांना न्यायालयापर्यंत येण्याची गरजच पडणार नाही. या दृष्टीने न्यायदूतांनी प्रभावीपणे कार्य करणे महत्त्वाचे आहे,’ असं ते म्हणाले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ई-प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. ते म्हणाले, ‘जिल्हा प्रशासन नागरिकांना त्यांच्या फाइल्स व कागदपत्रांच्या सद्यस्थितीची माहिती एका क्लिकवर मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहे.’

Makrand Jadhav Patil Hasan Mushrif : पश्चिम महाराष्ट्राकडे बुलढाणा, वाशीमचे पालकत्व

महामेळाव्यात पुढील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले:
बेबी केअर किट : पूजा लखन इंगळे, निकिता नारायण येनकर, कोमल अर्जुन टाले, कोमल धनंजय येनकर.
संजय गांधी निराधार योजना : शालिग्राम नामदेव राऊत
श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना: प्रतिभा आत्माराम तायडे
जात प्रमाणपत्र: स्नेहल बाबुराव इंगळे, यश गोपाल ताले, संकेत राजाभाऊ मुळे
उत्पन्न प्रमाणपत्र: निरंजन आढाव, संजय बोचरे
अधिवास प्रमाणपत्र: मनोज संतोष वानखडे