Devendra Fadnavis : ‘व्हिजन २०४७’ चा फडणवीसांकडून मास्टरप्लॅन; २० वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलणार

devendra-fadnavis-unveils-viksit-nagpur-2047-roadmap-5-lakh-crore-investment : ५.२५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा विदर्भाला बूस्टर डोस; ९ लाख रोजगारांचे ‘टार्गेट’

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागासाठी आगामी २० वर्षांचा एक महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक ‘रोडमॅप’ सादर केला आहे. आयआयएम (IIM) नागपूर येथे पार पडलेल्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेच्या कार्यशाळेत बोलताना त्यांनी ‘विकसित नागपूर-२०४७’ या आराखड्याची घोषणा केली. हा आराखडा केवळ कागदावर राहणार नाही, तर पुढील दोन दशकांत नागपूरला देशातील अग्रगण्य औद्योगिक आणि सेवा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तब्बल ५.२५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

या आराखड्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विदर्भात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी. फडणवीस यांच्या या ‘मास्टर प्लॅन’मुळे सुमारे ९ लाख नव्या रोजगारांची निर्मिती अपेक्षित असून, त्यापैकी ७५ टक्के गुंतवणूक ही खासगी क्षेत्रातून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘३० ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेच्या स्वप्नात नागपूर विभागाचा वाटा मोठा असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Rohit Pawar on Ajit Pawar death : अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात काय घडले?; ‘त्या’ ७५ सह्यांवरून रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

या आराखड्यात पाच प्रमुख क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे, ज्यातून विदर्भाची नवी ओळख निर्माण होणार आहे. नागपूरला देशातील महत्त्वाचे ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ आणि ‘यूएव्ही’ (UAV) हब म्हणून विकसित केले जाईल. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील खनिज संपत्तीचा वापर करून तिथे नवीन क्लस्टर्स उभारले जातील. गडचिरोलीत पोलाद आणि अवजड उद्योगांचा विस्तार करण्यावर विशेष भर असेल. पर्यावरणपूरक आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांसाठी ३५ हजार कोटी रुपयांची स्वतंत्र गुंतवणूक केली जाणार आहे.

Sunetra Pawar : ‘दुःखाचा सह्याद्री अन् कर्तव्याचा हिमालय!’; अदिती तटकरेंची सुनेत्रा पवारांसाठी भावूक पोस्ट

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण व्हिजनची अंमलबजावणी करण्यासाठी ‘मित्रा’ (Maharashtra Institution for Transformation) ही संस्था प्रमुख भूमिका बजावणार आहे. विकासाचा वेग वाढवण्यासाठी ‘गतीशक्ती’ प्लॅटफॉर्म आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ‘फोर्स मल्टीप्लायर’ म्हणून केला जाईल. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जीआयएस मित्रा’ (GIS MITRA) ॲपचे उद्घाटन करण्यात आले, ज्याद्वारे विकासकामांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग करणे सुलभ होणार आहे.

Mahayuti Government : मुख्यमंत्री बळीराजा योजनेत क्रांती! पाणंद रस्ते आता बारमाही वापरासाठी सज्ज

राजकीय निरीक्षकांच्या मते, या आराखड्याद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या होम ग्राऊंडवर विकासाचा मोठा अजेंडा सेट केला आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांचा कायापालट करण्याची ही रणनीती आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नागपूरला केवळ महाराष्ट्राचे नाही, तर दक्षिण आणि मध्य भारताचे प्रमुख लॉजिस्टिक केंद्र बनवून फडणवीस यांनी आपली ‘विकासपुरुष’ ही प्रतिमा अधिक गडद केली आहे.