BJP state body : भाजपने साधला विदर्भातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये बॅलन्स

Sanjay-bhende-parinay-fuke-included-in-BJP-state-executive-body : संजय भेंडे, परिणय फुके प्रदेश कार्यकारिणीत; तडस, पोटेंनाही संधी

Nagpur भाजपच्या कार्यकारिणीत संजय भेंडे यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रामदास तडस आणि अमरावतीमधून माजी आमदार प्रवीण पोटे यांनाही उपाध्यक्ष करण्यात आले आहे. यावेळी पूर्व विदर्भात सचिव म्हणून दोन नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यात आमदार परिणय फुके आणि नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांची कार्यकारिणी सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे रखडली होती. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीच कार्यकारिणी आजवर कार्यरत होती. महापालिका निवडणुकीची जबाबदारीसुद्धा बावनकुळे यांच्यावरच सोपवण्यात आली होती. आज मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली.

Nagpur municipal corporation : महापालिका निवडणुकीत पतीने केली बंडखोरी, माजी महापौर झाल्या भाजपच्या प्रदेश सचिव

आता विदर्भातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका वगळता जंबो कार्यकारिणी करण्याचा आणि अनेकांना सामावून घेण्याचा मोह प्रदेशाध्यक्षांनी टाळला असल्याचे दिसून येते. नव्या कार्यकारिणीत मोजक्याच लोकांना स्थान देण्यात आले. त्यात विदर्भातील केलेला पदाधिकाऱ्यांचा केलेला समावेश बघता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचा बॅलन्स साधला असल्याचे दिसून येते.

संजय भेंडे हे लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचे प्रमुख होते. येत्या काळात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रामदास तडस हे दोन वेळा वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

Bhaskar jadhav “सरकार इतकं लबाड की राज्यपालांकडूनही खोटं बोलवलं”

अमरावतीचे प्रवीण पोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश होता. अमरावतीचे ते पालकमंत्री होते. अर्चना डेहनकर यांची सचिवपदी केलेली नियुक्ती आश्चर्यकारक मानली जाते. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यांची नियुक्तीने अनेकांना धक्का बसला आहे.

आमदार परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर पाठवायच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजू जैन यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा जिल्ह्यातील साकोली विधान सभा मतदारसंघात भाजपने उभे केले होते.

samruddhi-land scam : समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा जमीन घोटाळा, सीआयडी चौकशीची मागणी

ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. प्रचारा दरम्यान पैसे वाटप व मारहाणीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या क्षणी नाना पटोले यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाल्याने भाजपची योजना फसली होती. फुके यांची पुन्हा एकदा विधान परिषदेवर नियुक्ती करून भाजपने त्यांना मुख्य राजकीय प्रवाहात कायम ठेवले आहे. आता सचिव म्हणून नियुक्ती करून संघटनेतही सहभागी करून घेतले आहे. गडचिरोलीचे माजी आमदार देवराव होळी यांना अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.