व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’

CM Devendra Fadnavis : ‘अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच पुढे जातोय’

model-financial-discipline-of-ajit-pawar-to-be-followed-by-governemt : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, कार्यशैलीचा गौरव

Mumbai महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक नियोजनावर भाष्य करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. “आम्ही आर्थिक शिस्त राखत विकास करणार आहोत. अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घेऊनच आम्ही पुढे जात आहोत,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. “राज्यातील सामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या उपाययोजनांचा समावेश आगामी अर्थसंकल्पात असेल. आम्ही केवळ घोषणाबाजीवर नाही, तर नियोजित विकासावर भर देत आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या स्टील सिटीत किती हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार? मुख्यमंत्र्यांनी आकडा केला जाहीर

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याबद्दल अत्यंत भावूक उद्गार काढले. “अजितदादा हे महाराष्ट्राला मिळालेले सर्वोत्तम उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या योगदानाचा आम्ही आदर करतो,” असे सांगत त्यांनी दादांच्या प्रशासकीय पकडीची आणि आर्थिक शिस्तीची आठवण करून दिली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती, ज्याचा पुनरुच्चार त्यांनी आजच्या भाषणातही केला.

विरोधी पक्षनेते पदाच्या अनुपस्थितीवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्षनेते नसतानाही कामकाज सुरळीत सुरू आहे. हे केवळ प्रक्रियेचे मुद्दे असून त्यात कोणतेही घटनात्मक बंधन नाही. आमचे पूर्ण लक्ष विधेयके मंजूर करण्यावर आणि विकासकामांवर आहे.”

Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

याशिवाय, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार्सवर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “डान्स बार नियमांचा गैरवापर करून ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये सुरू असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!