ballarpur-timber-museum-xylerium-demand-sudhir-mungantiwar-ganesh-naik-budget-session : अर्थसंकल्पात घोषणा करण्याची मुनगंटीवारांची मागणी, वनमंत्री गणेश नाईक यांचे सकारात्मक संकेत
Mumbai : अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ‘टिंबर म्युझियम’ आणि ‘झायलरियम’ (लाकूड संग्रहालय) उभारण्याची जोरदार मागणी करत अर्धा तास चर्चेत विषय उपस्थित केला. जगप्रसिद्ध सागवान (टिकवूड) आणि वनसंपदेचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, पर्यावरण शिक्षणाला चालना मिळावी आणि विदर्भाला संशोधनाचे केंद्र मिळावे, यासाठी हा प्रकल्प तातडीने जाहीर करावा, अशी आग्रही विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला, विपुल वनसंपदा आणि वाघांसाठी जगप्रसिद्ध जिल्हा असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी बल्लारपूरच्या सागवान लाकडाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर, देशाच्या संसद भवनातील फर्निचर, भारत मंडपम तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील काही काष्ठसामग्रीसाठी बल्लारपूरच्या सागवानाचा वापर झाल्याचे त्यांनी नमूद केले. देहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च सेंटरने महाराष्ट्रातील सागवान उच्च प्रतीचा असल्याचे प्रमाणित केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका
सुमारे 65 एकर जागेवर अत्याधुनिक टिंबर म्युझियम आणि झायलरियम उभारावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. येथे ‘राम-लक्ष्मण’ नावाने ओळखले जाणारे ऐतिहासिक लाकूड, भामरागड परिसरातील जीवाश्म, लाकडाच्या 32 दुर्मिळ प्रजाती, तसेच वनसंवर्धन, हवामान बदल आणि पर्यावरण शिक्षण यासंदर्भातील माहितीचे जतन व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे 150 कोटी रुपयांत हा प्रकल्प उभा राहू शकतो आणि त्यातून भविष्यातील पिढ्यांना ज्ञानाचे मोठे केंद्र उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या टिंबर म्युझियम व झायलरियममुळे या परिसराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळणार आहे. सागवान परंपरेचा ठेवा, राम-लक्ष्मण लाकूड ऐतिहासिक संदर्भांचे जतन आणि वैज्ञानिक पद्धतीने मांडणी यामुळे हे ठिकाण अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील एकमेव टिंबर म्युझियम म्हणून बल्लारपूर राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उभे राहील, ज्यामुळे देश-विदेशातून पर्यटकांची वाढ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
यासोबतच, या म्युझियममुळे संशोधन, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. लाकूडशास्त्र, वनसंवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, तर स्थानिक युवकांना मार्गदर्शक, व्यवस्थापन आणि इतर सेवांमध्ये रोजगार उपलब्ध होईल. बल्लारपूर टिंबर म्युझियम व झायलरियममुळे आंतरराष्ट्रीय ओळख अधिक बळकट होत औद्योगिक विकासालाही गती मिळेल. जागतिक पर्यटक मोठ्या संख्येने येतील. एकूणच, हा प्रकल्प पर्यावरण जनजागृती, आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकास यांना चालना देणारा ठरेल.यासोबतच स्थानिक युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
या चर्चेला उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीला सहमती दर्शवत सकारात्मक भूमिका घेतली. बल्लारपूरमध्ये टिंबर म्युझियम उभारण्याबाबत सरकार गंभीर असून “हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू,” असा शब्द त्यांनी सभागृहात दिला.
अर्थसंकल्पात या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विदर्भाच्या वनवैभवाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विदर्भाच्या वनवैभवाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








