Harshwardhan Sapkal : शेगाव आरोग्य मेळावा की कोट्यवधींची उधळपट्टी? सपकाळांचा सवाल

congress-president-attacks-union-government-for-shegao-national-health-fair : ४ कोटींचे हेलिपॅड दोन दिवसांत उखडणार, काँग्रेसचा केंद्रावर घणाघात

Buldhana आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर कोट्यवधी रुपयांच्या नियोजनशून्य उधळपट्टीचा गंभीर आरोप केला आहे.

सपकाळ यांच्या आरोपानुसार, शेगाव येथे आयोजित या मेळाव्यासाठी तब्बल १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. उद्घाटनासाठी द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवरच सुमारे ४ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

विशेष म्हणजे, श्री संत गजानन महाराज संस्थान यांनी हेलिकॉप्टर उतरण्यासाठीची जागा दोन दिवसांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. तरीही त्या ठिकाणी तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. राष्ट्रपतींचा दौरा संपल्यानंतर हे हेलिपॅड उखडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांकडून टिंबर म्युझियम आणि झायलरियमची मागणी, वनमंत्र्यांचा सभागृहातच ‘ऑन दि स्पॉट’ होकार!

सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर हे हेलिपॅड शासकीय जागेवर कायमस्वरूपी उभारले असते, तर शेगावसारख्या संत नगरीला दीर्घकालीन सुविधा मिळाली असती. मात्र केवळ दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करणे म्हणजे शासकीय पैशांचा चुराडाच आहे.”

कंत्राट प्रक्रियेवरही त्यांनी शंका उपस्थित करत संबंधित कंत्राट केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयाला देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपांबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मेळाव्यात ७० स्टॉलचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र २० ते २५ स्टॉलच उभारण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असेही सपकाळ यांनी नमूद केले.

PM Narendra Modi : नागपूर विमानतळाच्या विकासाची रखडपट्टी, आता थेट मोदींनाच घातले साकडे

या आरोपांमुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालयाकडून अधिकृत खुलाशाची मागणी होत आहे. मेळाव्याच्या खर्चाबाबत पारदर्शकता ठेवावी आणि खर्चाचा सविस्तर हिशोब जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.