maggots-found-in-AIIMS-canteen-food-health-minister-review-meeting : सकस आहार देण्यात तडजोड करू नका, अधिकाऱ्यांची झाडाझडती
Nagpur एम्समध्ये प्रशिक्षण घेणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कँटीनच्या जेवणात अळ्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची तत्काळ दखल घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी नागपूरला धाव घेतली. प्रशिक्षण कालावधीत मिळणारा आहार हा सकस, पौष्टिक आणि दर्जेदार असावा, तसेच मेसमधील स्वच्छतेबाबत कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील आरोग्य प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आहाराचा दर्जा सुधारण्याबाबत आबिटकर यांनी विशेष सूचना दिल्या. प्रशिक्षण कालावधीत मिळणारा आहार हा सकस, पौष्टिक आणि दर्जेदार असावा. तसेच मेस मधील स्वच्छतेबाबत कसलीही तडजोड केली जाऊ नये. उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा मिळाल्यास त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल होईल, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी आज नागपूर येथे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका
या बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. राज्यातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या सर्व प्रशिक्षण संस्थांचा दर्जा सुधारण्यावर त्यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले की, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे कौशल्य अद्ययावत असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल.
Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
या संस्थांना आधुनिक संसाधने उपलब्ध करून देऊन त्यांचा दर्जा राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांना आधुनिक वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्याची कार्यवाही सुरू होणार. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जागतिक स्तरावरील उत्तम आरोग्य पद्धतींची माहिती व्हावी, यासाठी त्यांना गरज पडल्यास इतर राज्यांत तसेच देश-विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात येईल, असे निर्देश आबिटकर यांनी दिले.








