Cm-fadnavis-Gr-released-still-fund-not-received : कामगारांना सानुग्रह म्हणून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पण लालफितीत अडकला
Nagpur मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, आश्वासन दिले आणि शासनादेश निघाला म्हणजे तुमचे काम झाले असे होत नाही. अधिकारी तातडीने कार्यवाही करतील असेही समजण्याचे कारण नाही. याची प्रचिती भाजपच्याच एका आमदाराला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा विधानसभेत बोलावे लागले, सरकारचे आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यावे लागले.
उमरेड रोडवरील नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आकस्मिक कारणामुळे बंद पडली होती. यामुळे सूतगिरणी मधील ११२४ कामगारांना नोकरी गेल्याने आर्थिक फटका बसला होता. या सूतगिरणीची जागा विकून आलेल्या पैशातून कामगारांना विशेष बाब म्हणून ५० कोटींचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला होता.
Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश
नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी येथील कामगारांच्या ३१ मार्च २००८ पर्यंत पगार व इतर देयके देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली होती. मात्र अद्यापही अनुकादानाची फाईल हाललेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार प्रवीण दटके विधानसभेत कडाडले. सहकारी सूतगिरणी मधील कामगारांच्या मागणीचा विषय यांनी विधानसभेत विषय मांडला.
Rajya sabha election : मोठा ट्विस्ट शरद पवार बिनविरोध राज्यसभेत!
आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे तातडीने सूतगिरणी कामगारांना निधी वितरित करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे ज्या सूतिगरीची जागा विकण्यात आली त्यावर आता टोलेजंग इमारती उभ्या झाल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे येथे फ्लॅट आहेत. ही जागा आता शहराच्या मध्यभागी आली आहे. कामगार मात्र अद्यापही अनुदानाची वाट बघत आहेत. ही सूतगिरणी एकेकाळी नागपूरचे वैभव होती. शेकडो लोकांचा रोजगार होती. येथे उत्पादित होणाऱ्या हातमागाचे कपडे व साहित्याची मोठी बाजारपेठ होती.








