Sunetra Pawar : देऊळगाव राजाला १८ कोटींचा निधी द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

18-crore-fund-demand-for-water-supply-scheme-pending-works-in-deulgaoraja-dcm-sunetra-pawar : पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मागणी, नगरोत्थान योजनेतील कामांची गती मंदावल्याची तक्रार

Deulgao raja शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने तातडीने १८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ही मागणी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

शहरासाठी शासनाच्या ‘नगरोत्थान’ योजनेअंतर्गत २०२३ मध्ये ३४.०८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वितरण व्यवस्था, मुख्य जलकुंभ तसेच जलशुद्धीकरण केंद्राची कामे सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. मात्र, काही अनुषंगिक कामे अद्याप अपूर्ण असल्यामुळे नव्या योजनेद्वारे शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

Harshwardhan Sapkal : गृहजिल्ह्यात काँग्रेसची गळती थांबे ना, सपकाळांचे टेंशन वाढले

निधीअभावी कंत्राटदाराने कामांची गती मंदावल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के निधी खर्च झाला असला, तरी शहरवासीयांना अद्याप या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. सध्या शहराला जुन्या योजनेद्वारे १५ ते १८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांकडून किमान तीन दिवसाआड पाणी देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, श्री संत चोखासागर सागर येथे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही योग्य वितरण व्यवस्था नसल्यामुळे शहराच्या शेवटच्या टोकावरील भागांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Buldhana Politics : हे चाललयं काय? भाजप-काँग्रेसची भलतील ‘केमिस्ट्री’

यावेळी आमदार मनोज कायंदे यांनीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करत शहरातील पाणीपुरवठा प्रश्नासह विविध विकासकामांबाबत मांडणी केली. तसेच निवृत्त कार्यकारी अभियंता धनसिराम यांनीही पाणीपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत माहिती देत लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि तीव्र होत चाललेली पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने तातडीने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.