LPG crisis : गॅस सिलींडरची काढली अंत्ययात्रा! काँग्रेसचे आंदोलन

congress-protest-against-lpg-price-hike-buldhana : गॅस दरवाढीविरोधात बुलढाणा जिल्ह्यात एल्गार; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदने

Buldhana घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेवर केंद्र सरकारने गॅस दरवाढ करून अतिरिक्त आर्थिक बोजा टाकल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोणार येथे शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार व छोटे व्यावसायिक अडचणीत आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

Ajit Pawar NCP : जिल्हाध्यक्षांना जाग आली, अचानक ५१ लोकांची कार्यकारीणीच जाहीर केली!

चिखली येथे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा पोहोचल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून दरवाढीचा निषेध नोंदविला.

जिल्हाभरात करण्यात आलेल्या आंदोलनात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, तसेच मका खरेदीचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

मेहकर येथे गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांचा ७/१२ सरसकट कोरा करण्याच्या मागणीसाठी मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Rohit Pawar rahul gandhi : रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधीना भेटले

मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅसच्या वाढत्या किमती तसेच सरकारी मका खरेदी केंद्राबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सरकारी खरेदी केंद्रावर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही मिळाले नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.