Payments-for-maize-procurement-stuck-congress-protest : काँग्रेसचा इशारा, तहसीलदारांना सोपवले निवेदन
Motala सरकारी खरेदी केंद्रावर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोन महिने उलटूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप करत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांकडे निवेदन देत तातडीने पैसे देण्याची मागणी केली आहे. तसेच बंद असलेले सरकारी मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रावर आपला मका विकला आहे. मात्र सुमारे दोन महिने उलटूनही त्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
याशिवाय अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मका शिल्लक असून सरकारी खरेदी केंद्र बंद असल्यामुळे त्यांना आपला माल विकणे कठीण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात माल विकण्याची वेळ येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Malkapur municipal council : नगर परिषदेचा ५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला?
म्हणून शासनाने तातडीने शेतकऱ्यांची थकीत रक्कम अदा करावी आणि सरकारी मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
LPG crisis : गॅस सिलींडरची काढली अंत्ययात्रा! काँग्रेसचे आंदोलन
हे निवेदन किसान तालुका सेलचे अध्यक्ष नितीराजसिंह राजपूत तसेच मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण (आप्पा) अर्जुन कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले.








