Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा !

chandrapur-shri-vitthal-temple-b-class-status-process-expedited-on-initiative-of-mla-sudhir-mungantiwar : चंद्रपूर-श्री-विठ्ठल-मंदिर-ब-वर्ग-स्थिती-प्रक्रिया-वेगवान-करण्यात-आमदार-सुधीर-मुनगंटीवार यांच्या-उपक्रमावर-आणखी-प्रक्रिया-आणखी-ताजगी-दिली

Mumbai: चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक आणि प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पुढील पंधरा दिवसांत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावास मान्यता देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख केला आहे. सुमारे आठशे वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या चंद्रपूर शहराने गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत विविध ऐतिहासिक टप्पे अनुभवले असून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शहरातील किल्ले, प्राचीन वास्तू तसेच विविध देवस्थाने ही चंद्रपूरच्या इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे असून माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही शहरवासीयांची प्रमुख आराध्य दैवते असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Sudhir mungantiwar: चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न विधानसभेत

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक देवस्थान असून अनेक दशकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच विविध उत्सवांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या मंदिराला चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत असताना हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होतात. शहरातील विविध भागांतील नागरिक, महिला मंडळे तसेच वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा चंद्रपूरच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली असून विठ्ठल नामाच्या गजरात भाविक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.

https://sattavedh.com/sudhir-mungantiwar-rajmata-rani-hirai-janmotsav-government-celebration-chandrapur-sudhir-mungantiwa

अलिकडच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून विशेषतः उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांची गरज भासत आहे. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन या सुविधा अधिक सक्षमपणे विकसित करता येतील, असेही आमदार मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. हे मंदिर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा भावनिक ठेवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Sudhir mungantiwar : चंद्रपूर रिंग रोडसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठोस मागणी

दरम्यान, श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठरावही आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार पारित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक आणि भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

__