Jitendra Awhad controversy : सभागृहात माफी मागत असतानाही आव्हाडांच्या वागण्यात मग्रुरी होती, मुधोजी भोसलेंनी सुनावले

mudhoji-bhosle-warns-jitendra-awhad-over-controversial-statement-about-shivaji-maharaj : आव्हाडांची मग्रुरी महाराष्ट्र सहन करणार नाही; तीव्र शब्दांत निषेध

Nagpur धर्मांतरबंदी विधेयकावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनीही आव्हाडांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

सभागृहात माफी मागत असतानाही आव्हाडांच्या वागण्यात मग्रुरी दिसत होती, अशी टीका करत मुधोजी भोसले म्हणाले, इतिहासाचा विपर्यास करून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराजांच्या महान चरित्रावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. सभागृहाने अशा विधानांवर काय कारवाई करायची ती करावी, मात्र आम्ही अशा विकृतीचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्राची जनता जितेंद्र आव्हाडांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देईल.

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘जुगाडतंत्र’ ओडिसातही यशस्वी; तीनही उमेदवार विजयी

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महायुतीने ‘धर्मांतरबंदी विधेयक’ मंजूर केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून, कोणालाही धर्मांतर करायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल. बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतरणाला आळा घालण्यासाठीच हा कायदा आणल्याचे त्यांनी सांगितले. याच विधेयकावरील चर्चेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाचे दाखले देताना महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.

Mla land mafia : सरकारी पत्रात ‘भूमाफिया’ असा उल्लेख; भाजप आमदार नरेंद्र मेहता प्रकरण

त्यानंतर भाजपचे आमदार त्यांच्यावर तुटून पडले. आव्हाडांचे विधान कामकाजातून काढून टाकावे आणि त्यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. अखेर आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त करताना, माझा हेतू महाराजांचा अपमान करण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले.