Revenue reforms : महसूल सेवा आता अधिक सुलभ, बुलढाणा पॅटर्न राज्यभर लागू होणार?

buldhana-collector-buldhana-pattern-revenue-reform-implementation-recommended : बुलढाणा जिल्ह्याच्या ‘सहज’ आणि ‘महसूल मित्र’ उपक्रमांची राज्यभर अंमलबजावणीची शिफारस

Buldhana प्रशासकीय सेवा अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘सहज प्रणाली’ आणि ‘महसूल मित्र’ या तांत्रिक उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगाने दखल घेतली आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक वेगवान झाल्या असून, हा ‘बुलढाणा पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याची शिफारस आयोगाने राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या ३१ व्या बैठकीत या प्रणालींचे सादरीकरण करण्यात आले. सेवा हक्क कायद्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ला चालना देण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Dharma swatantrya bill : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला विधानपरिषदेतही मंजुरी

‘महसूल मित्र’ हा एआय (AI) आधारित द्विभाषिक चॅटबॉट असून तो मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत येणाऱ्या विविध सेवा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया यांची माहिती घरबसल्या मिळते. यामध्ये ‘व्हॉईस टू टेक्स्ट’ सुविधा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा वापर करणे सोपे झाले आहे. जमीन विषयक कायदे आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही यावर उपलब्ध आहेत.

‘सहज प्रणाली’मुळे १८५० सालापासूनचे दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी-विक्रीचे जुने दस्तऐवज आता ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. नागरिक ठराविक शुल्क UPI द्वारे भरून QR कोड असलेले प्रमाणित दस्तऐवज थेट डाउनलोड करू शकतात. या सुविधेमुळे नागरिकांना जुन्या नोंदी शोधण्यासाठी शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही.

IMD Weather Alert : महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा

या तंत्रज्ञानामध्ये जीपीएस (GPS) आधारित तक्रार नोंदणीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा किंवा अन्य महसूल विषयक तक्रारी नागरिक थेट लोकेशनसह नोंदवू शकतात. याशिवाय विधी सहाय्य, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, ‘आपलं सरकार’ सेवा केंद्र आणि आधार केंद्रांची माहितीही या प्रणालीशी जोडण्यात आली आहे. या तांत्रिक बदलांमुळे महसूल प्रशासनातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन कामात अधिक गतिमानता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.