Notices issued to 32 BLOs for delay in SIR mapping : तिवसा, मोर्शी, धामणगावात कारवाई; कामात कुचराईवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
Amravati मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात मॅपिंगचे काम सध्या मिशनमोडवर सुरू आहे. एप्रिलमध्ये पुनरीक्षण मोहीम सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. दिरंगाई करणाऱ्या ३२ बीएलओंना शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली.
जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत मॅपिंगची प्रक्रिया सुरू असून, सध्याच्या २६,१६,२३६ मतदारांची सन २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी केली जात आहे. बीएलओंना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १२,८५,०५६ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, हे प्रमाण ४९.१२ टक्के आहे. पुढील आठ दिवसांत ही टक्केवारी किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
gautam-singhania : उद्योग विश्वात खळबळ; गौतम सिंघानिया यांच्या स्पीडबोटीचा अपघात
कामात कुचराई, घरभेटी न करणे, फोटो अद्ययावत करण्यासाठी फॉर्म-८ न भरणे, तसेच दुबार मतदारांचा शोध व सत्यापन न करणे आदी बाबींमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका संबंधित बीएलओंवर ठेवण्यात आला आहे. सात दिवसांत कार्यपूर्तीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा निलंबन, विभागीय चौकशी, एफआयआर आणि बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Mhada flats : म्हाडाच्या आलिशान फ्लॅटवर नेत्यांचा १४ वर्षांपासून ‘फ्री’ ताबा
जिल्हाधिकाऱ्यांकडून एसडीओ (ईआरओ) व तहसीलदार (एईआरओ) यांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. यामध्ये धामणगाव मतदारसंघातील २४, मोर्शीतील ५ आणि तिवसातील ३ अशा एकूण ३२ बीएलओंना नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी बीएलओंसोबत ऑनलाइन संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या आणि दिरंगाईबाबत खडेबोल सुनावले. मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी रेशन दुकानदारांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.








