Vanchit bahujan aghadi protests against RSS, attacks PM Narendra Modi : ‘एपस्टाईन फाईल’मध्ये नाव आल्याने अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असल्याची टीका
Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘एपस्टाईन फाईल’मध्ये आल्याने ते आता अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. जो माणूस कालपर्यंत ‘मुद्रा’च्या गप्पा मारत होता, तो आज अमेरिकेसमोर ‘मुजरा’ करत आहे, अशा अत्यंत तिखट शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला.
नागपूरच्या संयुक्त एल्गार मोर्चात त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणापासून ते आर्थिक गुलामगिरीपर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी सरसंघचालकांनी याचे उत्तर द्यावे असेही आवाहन केले.
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर थेट आरोप करताना सांगितले की, अमेरिकेकडे मोदींचा सर्व ‘चिटोरा’ आहे. अमेरिकेने मोदींना धमकावले आहे की, आमच्या करारावर स्वाक्षरी करा, नाहीतर तुमची फाईल उघड करू. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणि स्वाभिमान अमेरिकेसमोर गहाण ठेवला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हीच तुमची राष्ट्रभक्ती आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.
Zilla Parishad election : प्रशासक राजचा पाचवा वर्षारंभ; जिल्हा परिषदेत लोकशाही ‘कोमात’
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा फज्जा उडाल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, भारताचा ५० वर्षांपासूनचा जुना मित्र इराण, ज्याने काश्मीर मुद्द्यावर नेहमी भारताची साथ दिली, त्याला मोदींनी अमेरिकेसाठी वाऱ्यावर सोडले. आमचे १७ जहाज आणि शेकडो भारतीय इराणमध्ये अडकले आहेत, हिम्मत असेल तर त्यांना परत आणून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी इस्रायलने नाही, तर रशियाने मदत केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. सरसंघचालक मोहन भागवत आज नागपुरात असूनही भेटले नाहीत, यावर आंबेडकर म्हणाले, मचा हा सच्चा शिपाई भारताचे नाक कापत आहे.
Operation Lotus : साताऱ्याचा धडा; बुलढाण्यात ‘ऑपरेशन लोटस’मध्ये अडथळा की पुनरावृत्ती?
मोदी अमेरिकेला का घाबरत आहेत, हे विचारण्याची हिंमत संघात नाही का? जर देशाला गुलामगिरीतून वाचवायचे असेल, तर संघाने मोदी आणि अमित शहांच्या दबावातून बाहेर पडायला हवे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
संघाची आणि आमची विचारधार वेगळी आहे. या दोन्ही विचारधारेचा मेळ कधीही बसणार नाही. मात्र सध्या प्रश्न देशाचा आहे. देश शाबूत राहिला तरच तुम्ही आणि आम्ही सुरक्षित राहतील. सध्या देशाला वाचवणे व स्वातंत्र्य अबाधित राखणे गरजेचे आहे. यासाठी संघाने पुढाकार घेऊन मोदी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.








