Sanjay raut : सातारा प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याचे संकेत !

sanjay-raut-criticism-satara-incident-devendra-fadnavis-shiv-sena-politics : संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

Mumbai: सातारा येथील घडामोडींवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील गुंडशाही होऊच शकत नाही, असा थेट आरोप करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी साताऱ्यात घडलेला प्रकार हा उघड गुंडगिरी आणि झुंडशाहीचा नमुना असल्याचे म्हटले. या घटनेदरम्यान सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरच हल्ला झाला, त्यावेळी त्यांच्या अंगातील ‘शिवसैनिक’ कुठे गेला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवरही टीकेची झोड उठवली. भाजपाच्या मंत्र्यांकडूनच सत्ताधारी मंत्र्यांना मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत संघर्ष उघड झाल्याचे सूचित केले.

Ashok kharat case : कोणाच्यातरी महत्वाकांक्षा दडपण्यासाठी कट रचल्याची शंका!

राज्यातील सत्ताधारी मित्र पक्ष जास्त काळ एकत्र राहू शकणार नाहीत, असा दावा करत राऊतांनी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतही मोठा संकेत दिला. लोकशाहीचा खून झाला असे आरोप करणाऱ्यांवरच त्यांनी पलटवार करत, त्यांच्या हातांवरच लोकशाहीच्या खुनाचे डाग असल्याची टीका केली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांवर टीका करत त्यांनी पूर्वी शिवसेना सोडताना मोठमोठ्या घोषणा करणारे नेते आता गप्प झाल्याचे नमूद केले.

यावेळी राऊतांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचाही उल्लेख करत या प्रकरणात मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे समोर आली पाहिजेत, अशी मागणी केली. या प्रकरणातील अनेक गंभीर बाबी अजूनही समोर येणे बाकी असल्याचे सांगत त्यांनी पुढील काळात मोठे खुलासे होण्याचे संकेत दिले.

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा

सत्ताधारी मंत्र्यांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, स्वतःच्या सहकारी मंत्र्यांकडून मार खाऊनही हे नेते सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. साताऱ्यातील प्रकारानंतर सत्ताधाऱ्यांची प्रतिमा धुळीस मिळाल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी राज्य सरकारलाच जबाबदार धरले आहे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.