Crime news : पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यावर हल्ला

sangamner-panchayat-samiti-assault-case-sharad-thorat-ahilyanagar-crime-news : माजीमंत्री थोरात यांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा, व्हिडिओ व्हायरल

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घुसून एका कर्मचाऱ्यावर करण्यात आलेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुका अभियान व्यवस्थापकावर थेट कार्यालयात प्रवेश करून काही जणांनी हल्ला केल्याची ही गंभीर घटना असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी अचानक पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत संबंधित अधिकाऱ्यावर हल्ला चढवला. या घटनेत कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून कार्यालयात एकच गोंधळ उडाला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारी कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनातही संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Sanjay raut : सातारा प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याचे संकेत !

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून शरद थोरात यांच्यासह सुमारे 9 ते 10 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही चढला आहे.

मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील आणखी एका घटनेत खेडले परमानंद येथे किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात लोखंडी गज आणि स्टीलच्या कड्याने मारहाण करत जखमी करण्यात आले. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आर्यन बर्डे, शुभम बर्डे आणि आदित्य वैरागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ashok kharat case : कोणाच्यातरी महत्वाकांक्षा दडपण्यासाठी कट रचल्याची शंका!

अहिल्यानगर जिल्ह्यातील सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.