Supriya sule : ‘पांडुरंगा, काय दिवस आलेत महाराष्ट्रात?’, सुप्रिया सुळे यांचा संताप

supriya-sule-criticism-satara-incident-shambhuraj-desai-bjp-maharashtra : सातारा घटनेवरून कॅबिनेट मंत्र्यांवरील हल्ल्याची चौकशीची मागणी

Satara: सातारा येथे घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकारण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “पांडुरंगा, काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात” असे म्हणत त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

साताऱ्यात पालकमंत्री शंभुराज देसाई यांना रस्त्यावर मारहाण झाल्याच्या घटनेवर भाष्य करत सुळे म्हणाल्या की, एका कॅबिनेट मंत्र्यालाच जर अशा प्रकारे मारहाण होत असेल तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. काल विधीमंडळात शंभुराज देसाई यांनी केलेले वक्तव्यही गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या प्रकारामागील शक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Sanjay raut : सातारा प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याचे संकेत !

देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालतो, कोणाच्याही मनमानीने नाही, असे ठामपणे सांगत सुळे यांनी या घटनेत पोलिसांवर दबाव टाकला गेला असावा, असा संशय व्यक्त केला. महाराष्ट्रातील पोलिस अशा प्रकारची कृती स्वतःहून करणार नाहीत, त्यांच्या मागे काही अदृश्य शक्ती असू शकते, असेही त्यांनी म्हटले.

या प्रकरणाबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशीही याबाबत चर्चा केल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रासाठी ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद केले. लोकशाहीची ही हत्या असून अशा घटनांविरोधात ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील यांना जर धक्काबुक्की झाली असेल तर त्याची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. ज्या सरकारचा आपण भाग आहात, त्याच सरकारमधील लोकांकडून अशी वागणूक मिळत असेल, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok kharat case : कोणाच्यातरी महत्वाकांक्षा दडपण्यासाठी कट रचल्याची शंका!

सत्ताधारी मित्र पक्षांमध्येच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याकडे लक्ष वेधत सुळे यांनी ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले. आज साताऱ्यात घडले, उद्या इतर ठिकाणीही अशा घटना घडू शकतात, त्यामुळे वेळेतच कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.