व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Monsoon forecast : यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

Monsoon forecast : यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

monsoon-forecast-india-el-nino-impact-rainfall-update-marathi-news : ‘एल निनो’चा प्रभाव वाढणार, शेतीसमोर आव्हानांची शक्यता

Mumbai : यंदाच्या मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे देशातील शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, यंदा देशात मोसमी पावसाचे प्रमाण सुमारे ८० सेंटीमीटर राहण्याचा अंदाज आहे. भारतातील १९७१ ते २०२० या कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ८७ सेंटीमीटर इतके आहे, त्यामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान अंदाजात सुमारे ५ टक्क्यांची त्रुटी राहू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अंदाजामागे प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘एल निनो’ स्थितीला मुख्य कारण मानले जात आहे. ‘एल निनो’मुळे साधारणपणे भारतातील मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतो आणि पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता वाढते. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण आणखी कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट’ निकाल; वनमजुरांचा ८ महिन्यांचा वेतनाचा वनवास संपला

तथापि, काही प्रमाणात दिलासादायक बाबही समोर आली आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत हिंदी महासागरात ‘पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी पोषक मानली जाते. त्यामुळे या कालावधीत पावसाचे प्रमाण वाढू शकते आणि ‘एल निनो’चा परिणाम काही अंशी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Operation tiger : राजकीय खळबळ; एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल !

दरम्यान, देशातील अन्नधान्य उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या मध्य आणि उत्तर-पश्चिम भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणाऱ्या सुधारित अंदाजानंतरच पेरणीबाबत अंतिम निर्णय घेणे योग्य ठरेल, असेही हवामान विभागाने सुचवले आहे.

Cabinet decisions : आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करण्यास मंजुरी

एकूणच, यंदाचा मान्सून अनिश्चिततेच्या छायेत असल्याचे चित्र असून ‘एल निनो’ आणि ‘इंडियन ओशन डायपोल’ या दोन्ही घटकांवर पावसाचे अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

__

error: Content is protected !!