Chandrashekhar Bawankule in action mode against the drugs racket : कठोर कारवाईचा इशारा, अमरावतीची घटनेनंतर फिरली चक्रे
Nagpur राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आता महायुती सरकार अत्यंत आक्रमक झाले असून, गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. अमरावती येथील संवेदनशील प्रकरण असो वा राज्यातील ड्रग्जचे पसरलेले जाळे, या सर्व प्रकरणांत सरकार ‘ॲक्शन मोड’मध्ये असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिला.
अमरावती येथील घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घातले आहे. या प्रकरणावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, हे साधे प्रकरण नसून याची सखोल चौकशी सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले पुरावे तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर मोठी कारवाई होणारच. मात्र, याच वेळी त्यांनी काही ठिकाणी होत असलेल्या आंदोलनांवर नाराजी व्यक्त करत, असे कार्यक्रम करणे योग्य नसल्याचेही स्पष्ट केले.
Khadakpurna dam : १६ गावांच्या पाण्याची फाईल २० वर्षांत मंत्रालयात पोहोचलीच नाही
राज्यात वाढत्या ड्रग्जच्या विळख्यावर सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम उघडली आहे. आता प्रत्येक गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहे. आम्ही ड्रग्ज विरोधात एक मजबूत यंत्रणा आणि मोठे जाळे उभे केले आहे. आता यातून कोणीही वाचू शकणार नाही, असा सज्जड दम बावनकुळे यांनी दिला.
यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. रोहित पवार केवळ प्रसिद्धीसाठी आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी विधाने करत असतात, असा टोला त्यांनी लगावला. तसेच कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नसल्याच्या चर्चांवर बोलताना, बैठकीच्या वेळेत झालेला बदल आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ही अनुपस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Operation lotus : ‘ऑपरेशन टायगर’नंतर ‘ऑपरेशन लोटस’, बुलढाण्यात खळबळ
खरात एन्काऊंटर प्रकरणावर बोलताना त्यांनी बजावले की, जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते खुशाल एसआयटीकडे द्यावेत, केवळ हवेत विधाने करून तपासाची दिशा भरकटवू नये. राज्याच्या सुरक्षिततेसाठी सरकार कोणतीही ढिलाई दाखवणार नसल्याचा पुनरुच्चार यावेळी बावनकुळे यांनी केला.








