व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal Corporation : भाजपच्या तक्रारीवरून शिंदेसेनेच्या नगरसेवकाला अटक; जामीन मिळाला, पण…

Akola Municipal Corporation : भाजपच्या तक्रारीवरून शिंदेसेनेच्या नगरसेवकाला अटक; जामीन मिळाला, पण…

BJP complaint leads to arrest of a corporator from Shivsena (Eknath Shinde faction); later released on bail : महापालिकेचा झाला आखाडा; महायुतीतील अंतर्गत वाद अधिक चिघळणार

Akola महापालिकेतील वादप्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. स्थायी समिती सभापती तथा भाजप नेते विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर काही अटी व शर्तींसह त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

बुधवारी सायंकाळी महापालिकेत विजय अग्रवाल आणि सागर भारुका यांच्यात झालेल्या वादात भारुका व मंगेश काळे यांनी कथितपणे अश्लील शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारुका यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिंदेसेनेच्या आंदोलनानंतर पोलिसांनी भारुका यांना ताब्यात घेत अटक केली. सायंकाळी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र बचाव पक्षाने जामिनासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही कलमे जामीनपात्र असल्याचे नमूद करत भारुका यांना अटींसह जामीन मंजूर केला.

sudhir mungantiwar : चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांची प्रभावी लढाई; शेतकऱ्यांसाठी प्रदूषणावर कडक प्रहार!

न्यायालयाने सागर भारुका यांना महाराणा प्रताप (कोतवाली) चौक परिसरात येण्यास बंदी घातली आहे. तसेच दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Vidhan parishad election : १० जागांसाठी एकाच दिवशी दोनदा मतदान, पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित

महापालिकेतील या वादाला आता वैयक्तिक स्वरूप आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विजय अग्रवाल यांना भारुका ‘मामा’ म्हणत असत; मात्र अलीकडील घडामोडीनंतर दोघांतील मतभेद तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. आगामी सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समिती बैठकीत दोघे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!