व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Bageshwar baba statement on Shivaji Maharaj : शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाला...

Bageshwar baba statement on Shivaji Maharaj : शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाला ‘ढगात’ कधी पाठवणार?

Vijay Wadettiwar targets Sanjay Gaikwad : वडेट्टीवारांचे आमदार संजय गायकवाडांना खुले आव्हान

Nagpur ‘मी आता लढाया करून थकलो आहे, तुम्हीच राज्य सांभाळा’, असे विधान छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना उद्देशून केल्याचा दावा बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असतानाच, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत त्यांना उघड आव्हान दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी छत्रपतींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या एका प्रकाशकाला थेट जीवे मारण्याची धमकी देणारे आणि शिवीगाळ करणारे संजय गायकवाड आता गप्प का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, महाराजांच्या नावावर राजकारण करणारे आणि धमक्या देणारे गायकवाड आता कुठे लपले आहेत? बागेश्वर बाबाला ते आता शिवीगाळ का करत नाहीत? या भोंदू बाबाला तुम्ही ‘ढगात’ कधी पाठवणार, हे एकदा जाहीर करा. जर तुमच्यात हिंमत असेल तर या बाबाला चपराक लगावा, संपूर्ण महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल.

Strike Postponed : राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप स्थगित

वडेट्टीवार यांनी केवळ गायकवाडांवरच नव्हे, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही गंभीर आरोप केले. ज्या मंचावरून धीरेंद्र शास्त्रीने शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा अपमान केला, त्या मंचावर स्वतः मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. छत्रपतींचा अपमान सुरू असताना यापैकी कोणीही त्या भोंदूला रोखले नाही, हे दुर्दैवी आहे. शिवरायांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा हा भाजप-संघाचा ठरवून केलेला मनुवादी कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट घातला जात आहे का?” असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.

Thackeray fadnavis meeting : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबते !

स्वराज्य उभे करताना शिवरायांनी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मोगलांसह इंग्रज-डचांनाही गुडघे टेकवायला लावले होते. अशा पराक्रमी राजाचा अवमान करणाऱ्या या भोंदू बाबाला तात्काळ अटक झालीच पाहिजे आणि महाराष्ट्र धर्माला नख लावणाऱ्या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली आहे. आता वडेट्टीवारांच्या या आव्हानाला आमदार संजय गायकवाड काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!