व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र LPG shortage : नागपूरकरांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट

LPG shortage : नागपूरकरांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट

No LPG cylinder shortage in Nagpur, collector assures : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कंपन्यांचा मोठा निर्णय

Nagpur नागपूर शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेत गॅस कंपन्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांनी जिल्ह्याचा गॅस सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा थेट दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेले बुकिंग आता वेगाने पूर्ण होणार असून सिलिंडरसाठी होणारी प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे.

जिल्ह्यातील वाढती मागणी आणि ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार, एचपीसीएल कंपनीने आपला ८,४५० सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा वाढवून आता थेट १९,७०० वर नेला आहे. बीपीसीएल कंपनीकडून दररोज सुमारे ६,९७२ सिलिंडर पुरवले जात असून, आयओसीएलने ज्या एजन्सीकडे वेटिंग लिस्ट मोठी आहे, तिथे पुरवठा दुप्पट केला आहे. वितरणात पारदर्शकता राहावी यासाठी ‘ज्यांनी आधी बुकिंग केले आहे त्यांना आधी सिलिंडर’ (FIFO पद्धत) यानुसारच वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Devendra fadnavis : “पेरणीची घाई नको”; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन

केवळ पुरवठा वाढवून न थांबता प्रशासनाने वितरणाची साखळी सुधारण्यावरही भर दिला आहे. ज्या एजन्सींकडे तक्रारींचे प्रमाण अधिक आहे, तिथे अतिरिक्त वाहने आणि डिलिव्हरी बॉय तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गॅस चोरी आणि बनावट डिलिव्हरी रोखण्यासाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC/OTP) अनिवार्य करण्यात आला असून, ९० ते ९५ टक्के वितरण याच पद्धतीने पूर्ण करण्याचे बंधन एजन्सीवर टाकण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांवर ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Sureshkumar jethaliya : अजितदादांचे विश्वासू नेते, सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराने निधन

वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व गॅस एजन्सींना वितरण केंद्रावर येणाऱ्या ग्राहकांसाठी शेड आणि सावलीची व्यवस्था करण्याची सक्ती केली आहे. यामुळे उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. सध्या नागपूर शहर आणि ग्रामीण भागात परिमंडळ आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण केले जात आहे. जागतिक आणि तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेली ही टंचाई आता अतिरिक्त पुरवठ्यामुळे लवकरच दूर होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!