व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola RSS office attack : संघ कार्यालय हल्ला प्रकरण; आमदार साजीद पठाणांसह...

Akola RSS office attack : संघ कार्यालय हल्ला प्रकरण; आमदार साजीद पठाणांसह १२ जणांवर दोषारोप, निकाल २५ मे रोजी

Charges framed against MLA Sajid Pathan and 12 others in RSS office attack case : ५० ते ६० जणांनी हल्ला केल्याचा आरोप, घटना बनावट असल्याचा बचाव पक्षाचा दावा

Akola राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आमदार साजीद खान पठाण, माजी महापौरांसह १२ जणांवर दोषारोप ठेवण्यात आले असून, या खटल्याचा निकाल २५ मे रोजी जाहीर होणार आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

तत्कालीन सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबर २०१० रोजी काँग्रेसच्या वतीने मदनलाल धिंग्रा चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा गांधी रोडवरील संघ कार्यालयाकडे वळल्यानंतर सुमारे ५० ते ६० जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप आहे.

Chandrashekhar bawankule : बंगालमध्ये दडपशाहीचा अंत आणि विकासाचा झंझावात; विरोधकांनी आता तरी आत्मपरीक्षण करावे

या घटनेत भूषण पिंपळगावकर, अमोल मुलमुले तसेच पोलिस कर्मचारी एएसआय सुरेश ठाकूर जखमी झाले होते. मोर्चादरम्यान पुतळा जाळण्यात आल्याने ठाकूर भाजले गेले होते. पुढे काही वर्षांनी त्यांचे निधन झाल्याने त्यांची साक्ष नोंदवता आली नाही.

या प्रकरणात ५० ते ६० जणांपैकी १२ जणांवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत. यात आमदार साजीद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड, विजय परमार, शांता नृपनारायण, राजेश भारती, प्रकाश तायडे, उदय देशमुख, मनिष हिवराळे, चंदा ठाकूर, सीमा ठाकरे, मज्जीद पहलवान आदींचा समावेश आहे.

Hindi exam stay : हिंदी भाषा परीक्षेला अखेर स्थगिती, मंत्री उदय सामंत यांची घोषणा !

बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना ही घटना घडलीच नसून संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचा दावा केला. आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!