व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ATS detained suspected : पाकिस्तान कनेक्शनचा संशय; वाशिममधील युवक एटीएसच्या ताब्यात, अकोल्यातील...

ATS detained suspected : पाकिस्तान कनेक्शनचा संशय; वाशिममधील युवक एटीएसच्या ताब्यात, अकोल्यातील युवकाचीही चौकशी

Suspected Pakistan connection; youth from Washim detained by ATS, Akola youth also under investigation : पाकिस्तानातील लोकांसोबत सोशल मीडियावरून संपर्कात असल्याचा आरोप

Akola दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वाशिम जिल्ह्यातील एका युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अकोला जिल्ह्यातील एका युवकाचाही सहभाग संशयाच्या भोवऱ्यात आल्याने त्याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. पाकिस्तानस्थित व्यक्तींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानस्थित कथित ‘डोग्रा गँग’चा प्रमुख शहजाद भट्टी याला सोशल मीडियावर फॉलो केल्याच्या संशयावरून राज्यभरात एटीएसने विशेष तपास मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तब्बल नऊ जिल्ह्यांत धाडसत्र राबविण्यात आले असून संशयित हालचालींची चौकशी सुरू आहे.

hike in MSP rates : शेतमालावरील हमीभाव दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

ताब्यात घेतलेल्या युवकाची सध्या सखोल चौकशी सुरू असून, त्यातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अकोल्यातील संशयित युवकाचे सोशल मीडिया अकाउंट, ऑनलाइन संपर्क तसेच डिजिटल व्यवहारांचीही बारकाईने तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून देशविरोधी किंवा संशयास्पद नेटवर्कशी संपर्क वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये एटीएसच्या पथकांनी तपासाची गती वाढविली असून राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Ashok kharat case : 49 दिवस चौकशी, ‘दैवी शक्ती’च्या नावाने केलेल्या कृत्यांचे धक्कादायक खुलासे

दरम्यान, या प्रकरणाबाबत तपास यंत्रणांकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कारवाई गोपनीय स्वरूपाची असल्याने ताब्यात घेतलेल्या युवकाची ओळख उघड करण्यात आलेली नाही. “अकोला एटीएसने वाशिम जिल्ह्यातील एका युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, कारवाई अत्यंत गोपनीय स्वरूपाची असल्याने अधिक माहिती सध्या देता येणार नाही,” अशी माहिती वाशिमचे पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.

error: Content is protected !!