Congress General Secretary Abhijeet Sapkal Appointed as State Coordinator for SIR Campaign : मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवर काँग्रेसची करडी नजर; प्रत्येक बूथवर BLA नियुक्तीची तयारी
Nagpur : निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर व्यापक नियोजन सुरू केले आहे. या अभियानाची संपूर्ण राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण राज्यातील SIR अभियानाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता अभिजीत सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.मतदार यादीचे पुनर्निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची आणि थेट लोकशाही प्रक्रियेशी निगडित बाब असल्याने काँग्रेस पक्ष या संपूर्ण प्रक्रियेकडे विशेष गांभीर्याने लक्ष देणार आहे.
Anjali damania : “पार्थ पवार स्वतःलाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा समजू लागले”
बिहार आणि अलीकडेच बंगालमध्ये विरोधकांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण अभियानाच्या माध्यमातून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्यानेच आपल्या पक्षाचा पराभव झाल्याचा थेट आरोप केला होता. या संपूर्ण अभियानावर काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासूनच तीव्र आक्षेप आहे.
सत्ताधारी भाजप आपली मते मतदार यादीत कायम ठेवून विरोधकांच्या मतदारांची नावे पद्धतशीरपणे वगळत असल्याची दाट शंका घेतली जात आहे. म्हणूनच काँग्रेसने आता या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली असून, या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक बूथवर ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (BLA) नियुक्त करण्यात येणार आहेत. या नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक ते विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या मोहिमेत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी तसेच विधानसभा उमेदवारांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले आहे.
Manoj jarange : “दिल्लीकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाच तर सरकार हादरेल”
दरम्यान, नवनियुक्त राज्य समन्वयक अभिजीत सपकाळ यांनी याआधी प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे. त्यांच्याच कुशल मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह इतर राज्यांतही काँग्रेसने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा अत्यंत अचूक व टोकदार वापर केला होता. त्यांचा हाच निवडणूक रणनीतीचा दांडगा अनुभव लक्षात घेता, पक्षाने आता ‘SIR’ सारख्या संवेदनशील अभियानाची धुरा त्यांच्यावर सोपवून विरोधकांचे मनसुबे उधळण्याची तयारी केली आहे.








