व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bachchu kadu : बच्चू कडूंवर शिंदेंचा मोठा डाव; भाजपची विदर्भातील डोकेदुखी वाढणार!

Bachchu kadu : बच्चू कडूंवर शिंदेंचा मोठा डाव; भाजपची विदर्भातील डोकेदुखी वाढणार!

bachchu-kadu-appointed-shiv-sena-vidarbha-chief-eknath-shinde-bjp-tension : शिवसेनेच्या विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती, महायुतीत संघर्षाची चिन्हे

Nagpur : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही काळ राजकीयदृष्ट्या शांत झालेल्या बच्चू कडू यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विधान परिषदेवर पुनर्वसन केले. आता त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) विदर्भ विभाग प्रमुखपदी बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आल्याने विदर्भातील भाजपची चिंता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हेही या घडामोडींमुळे दिसू लागली आहेत.

अलीकडेच बच्चू कडू यांनी शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ गुंडाळण्याची अट मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, बच्चू कडू यांनी हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावत, शिवसेनेसोबतच प्रहार संघटनाही स्वतंत्रपणे कार्यरत राहील, असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Ncp strategist : अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा राजकीय गेमप्लॅन! बदलले रणनीतीकार

मूळचे शिवसैनिक असलेले बच्चू कडू यांनी शेतकरी आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवरून शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी ‘प्रहार’च्या माध्यमातून विदर्भात स्वतःची वेगळी राजकीय ताकद उभी केली. सलग चार वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येत त्यांनी स्वतःची प्रभावी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकदा राज्यातील सत्तासमीकरणांवर परिणाम झाला असून, त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ नेहमीच चर्चेत राहिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. नंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना पाठिंबा देत महायुतीत प्रवेश केला. मात्र, त्यानंतर मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिंदे गटाची ऑफर नाकारत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र, हा प्रयोग त्यांच्यासाठी अपयशी ठरला आणि स्वतः बच्चू कडूंसह प्रहारच्या बहुतांश उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

Petrol diesel price : इंधन दरवाढीचा दुहेरी झटका! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग

पराभवानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा आंदोलकाची भूमिका घेत थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे टीका केली होती. तसेच महसूलमंत्री

Chandrashekhar bawankule : विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न

अमरावतीमध्ये भाजपने रवी राणा आणि नवनीत राणा यांना बळ देत बच्चू कडूंना राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीत, भाजप बच्चू कडू यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच, एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत घेत थेट विदर्भाची जबाबदारी देत मोठा राजकीय डाव टाकला आहे.

शिंदे गटाने बच्चू कडू यांच्या माध्यमातून विदर्भात भाजपला पर्यायी ताकद उभी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भातील महायुतीचे राजकारण अधिक टोकदार आणि संघर्षमय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

_

error: Content is protected !!