व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water crisis : विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेला यश; चिखलीत पाणीपुरवठा पूर्ववत

Water crisis : विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेला यश; चिखलीत पाणीपुरवठा पूर्ववत

Opposition’s aggressive stand succeeds; water supply restored in Chikhli : वीस दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना, तक्रारींचीही घेतली गेली नाही दखल

Chikhli गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर नगरपरिषद प्रशासनाला हालचाल करावी लागली. शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनावर वाढलेल्या दबावामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे सांगितले जात आहे.

शहरात तब्बल १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राकॉच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत नगरपरिषद प्रशासनाला थेट इशारा दिला होता.

Neet paper leak : पुण्यातून उघड झाला नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड खेळ!

सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरत पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. “चिखलीकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप करत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढविला.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील डॉ. इसरार, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. अमोल लहाने, गोकुळ शिंगणे, गोपाल देव्हडे, रत्नदीप शिनगारे, उबेद अली खान, आनंद बोन्द्रे, प्रशांत भटकर, संतोष देशमुख आणि पी. एस. वायाळ यांनी चिखली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जलसाठा, वितरण व्यवस्था आणि शहरातील विविध भागातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना नियमित, वेळेवर व सुरळीत पाणीपुरवठ्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ वादात संजय गायकवाडांना न्यायालयाचा दणका

वाढत्या राजकीय दबावामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत २३ मेपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला आहे. “चिखलीकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील आणि नागरिकांना वेठीस धरणारा कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका विरोधी पक्षाने स्पष्ट केली.

error: Content is protected !!