व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Shivaji Education Society : श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रद्द; धर्मादाय उपायुक्तांचा...

Shivaji Education Society : श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रद्द; धर्मादाय उपायुक्तांचा मोठा निर्णय

Shri Shivaji Education Society election cancelled; major decision by the Deputy Charity Commissioner : पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश; विद्यमान पदाधिकारी न्यायालयात जाणार

Amravati विदर्भातील नामांकित श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्या कार्यकारी परिषदेची सप्टेंबर २०२२ मध्ये झालेली निवडणूक धर्मादाय उपआयुक्तांनी रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

धर्मादाय उपआयुक्त राजेश इंगोले यांनी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अवैध ठरवण्यात आली. तसेच नव्या स्वतंत्र निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करून पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

NCP Buldhana : राष्ट्रवादीतील नाराजी शमवण्याचा प्रयत्न; पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे राजीनामे पक्षाकडून अस्वीकृत

११ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यकारी परिषदेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीविरोधात सचिव विजय ठाकरे यांनी धर्मादाय उपआयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. निवडणूक प्रक्रियेत नियमभंग, मतमोजणीतील विसंगती आणि कार्यपद्धतीबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उपआयुक्तांनी निवडणूक रद्द करण्याचा निर्णय दिला. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, “न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल,” असे स्पष्ट केले.

Diesel shortage : डिझेल टंचाईविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मेरा चौकीवर दोन तास रास्तारोको, महामार्ग ठप्प

दरम्यान, या निर्णयामुळे संस्थेतील अंतर्गत राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकीकडे शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

निर्णयामागील प्रमुख आक्षेप
संपूर्ण कार्यकारी परिषदेची निवड एकाचवेळी घोषित करण्यात आली.
निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचे आरोप करण्यात आले.
मतमोजणीतील आकडेवारीत मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला.
मतदार यादीत कथितरीत्या फेरफार झाल्याचा आरोप.

error: Content is protected !!