व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Congress srujan Abhiyan : वऱ्हाड काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; जुन्या नेत्यांसमोर संघटन...

Congress srujan Abhiyan : वऱ्हाड काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; जुन्या नेत्यांसमोर संघटन मजबूत करण्याचे आव्हान

Old Congress leaders face the challenge of strengthening the party organization : अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीतून पहिले पाऊल

Akola काँग्रेसने पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करत संघटन पुनर्बांधणीचा संदेश दिला आहे. ‘संघटन सृजन’ अभियानातून पुढे आलेल्या नव्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास दाखवला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती महत्त्वाची मानली जात आहे.

अकोला शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र गवई, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनाही संघटनात्मक अनुभव असला तरी आगामी काळात पक्षातील गटबाजी, नाराज कार्यकर्ते आणि भाजपच्या वाढत्या प्रभावाला तोंड देत काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. महेंद्र गवई यांनी युवक काँग्रेस आणि अनुसूचित जाती विभागात काम करत संघटनेत स्वतःची ओळख निर्माण केली.

Akola Municipal corporation : मान्सूनपूर्व नालेसफाई रखडल्याने स्थायी समिती संतप्त; प्रशासनाला फैलावर

शहरातील कार्यकर्त्यांमध्ये संपर्क आणि समन्वय राखणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दुसरीकडे प्रकाश तायडे हे ग्रामीण भागातील संघटनावर मजबूत पकड असलेले नेते मानले जातात. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. काँग्रेसच्या या बदलातून नव्या आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला असला, तरी पक्षातील जुन्या गटांमध्ये समन्वय राखणे हे नव्या जिल्हाध्यक्षांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

Sanjay Gaikwad : गायकवाड चौकशीच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ वादाने राजकारण तापले

विशेषतः ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समीकरणे जुळवून पक्षाची ताकद वाढविण्यावर त्यांची कसोटी लागणार आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष बदलानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांपूर्वी संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!