vidarbha-red-heat-alert-brahmapuri-temperature-47-degree-weather-update : ब्रह्मपुरीत तापमान 47 अंशांच्या उंबरठ्यावर
Mumbai : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. हवामान विभागाने नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या सहा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हा वगळता संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमान सातत्याने वाढत असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे तापमानाने 47 अंशांच्या उंबरठ्याला स्पर्श केला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्टमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. आजही विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान 45 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 25 मेपासून सुरू झालेल्या नव
तपामुळे उष्णतेची तीव्रता अधिक वाढली असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
Cng price hike : 15 दिवसांत 12 रुपयांची दरवाढ, वाहनधारकांना मनस्ताप !
दरम्यान, नागपूरसह विदर्भातील विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झा
ल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. नागपूर रेल्वे स्थानक परिसरात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या तीन प्रवाशांचा आणि दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. रेल्वे प्रवासादरम्यान या प्रवाशांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय शहरातील सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरात आणखी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. वाढत्या तापमानामुळे भिक्षेकरी, बेघर नागरिक आणि मजूर वर्गाला सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. दिवसभर कडक उन्हात राहावे लागत असल्याने अनेकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी पिणे, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळणे, हलके सुती कपडे वापरणे आणि डोके झाकून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. टरबूज, काकडी, संत्री, द्राक्षे यांसारख्या पाणीयुक्त फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
onion farmers relief : कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा
तज्ज्ञांनी दारू, चहा, कॉफी आणि जास्त साखरयुक्त थंड पेये टाळण्याचा सल्ला दिला आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेमुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा सतत घाम येणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








