व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule : १७ पैकी १७ जागांवर महायुतीचा विजय निश्चित, बिनविरोध निवडणुकीचा...

Chandrashekhar Bawankule : १७ पैकी १७ जागांवर महायुतीचा विजय निश्चित, बिनविरोध निवडणुकीचा बावनकुळेंचा दावा फसला

Chandrashekhar Bawankule’s claim of an unopposed Legislative Council election falls flat : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये एकी, समन्वयातून जागावाटपाचा निर्णय

Nagpur विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजेच १७ पैकी १७ उमेदवार विजयी होणार असून, राज्यात महायुतीला केवळ विजयच नाही तर ऐतिहासिक आणि मोठा राजकीय विजय मिळेल, असा ठाम विश्वास महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी अत्यंत एकमताने घेतला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भारतीय जनता पक्ष ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवत असून, स्थानिक राजकीय परिस्थिती आणि मतदारसंघातील ताकद लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरची निवडणूक बिनविरोध करणार असल्याचा दावा यापूर्वी बावकुळे यांनी केला होता. मात्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाल आहे. यावर ते म्हणाले, नागपूरची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा झाली होती, मात्र प्रत्येक पक्षाची स्वतंत्र भूमिका असते आणि निवडणूक होणे हा लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे, असे म्हणत त्यांनी आपली सुटका करून घेतली.

Atul Londhe : अतुल लोंढे लढणार की माघार घेणार?; काँग्रेसमधील संभ्रम उघड

अमरावतीच्या राजकीय घडामोडींवर बोलताना बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोन्ही प्रगल्भ नेते असल्याचे सांगत, काही स्थानिक मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील आणि मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत, काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचे आधी आत्मपरीक्षण करावे, असा टोला लगावला; तसेच महिला आरक्षण विधेयकाला पूर्ण पाठिंबा न दिल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची संधी गमवावी लागल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.

भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत विचारले असता, जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत सक्षम आणि प्रगल्भ व्यक्तींना संधी देणे गरजेचे असते आणि पक्ष संघटनेत नवे-जुने असा समतोल राखणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ओबीसी आरक्षणाच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर बोलताना, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होऊ नये असा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय असून, आता न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे; त्यानंतरच जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातील अनेक प्रश्न स्पष्ट होतील, असे त्यांनी नमूद केले.

Development of Buldhana : घोषणांचा पाऊस, विकासाचा दुष्काळ; घाटाखालच्या भागातील प्रकल्प अजूनही रखडले

विशेषतः नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीवर भाष्य करताना बावनकुळे यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोद्दार यांच्या विजयाचा दावा केला. डॉ. पोद्दार यांनी कोरोना काळात केलेल्या मोफत आरोग्यसेवेसह त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करत, नागपुरात भाजपला यावेळी विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!