व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Pravin Pote-Ravi Rana : प्रवीण पोटे-रवी राणा यांचे राजकीय मनोमिलन; जुने वैर...

Pravin Pote-Ravi Rana : प्रवीण पोटे-रवी राणा यांचे राजकीय मनोमिलन; जुने वैर विसरून महायुती एकत्र

Political reconciliation between Pravin Pote and Ravi Rana; leaving old rivalries behind : अनिल बोंडे यांची मध्यस्थी, निवडणुकीच्या तोंडावर बदलली राजकीय समीकरणे

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे भाजप नेते तथा महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि आमदार रवी राणा यांच्यात अखेर राजकीय मनोमिलन झाले आहे. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.

प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पोटे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन राणा यांचे स्वागत केले. या भेटीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Chainsukh Sancheti : आमदारांची शेरोशायरी… लोक म्हणाले पहिले मतदारसंघातील समस्या बघा!

प्रवीण पोटे पाटील आणि आमदार रवी राणा यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीला कोणताही फटका बसू नये, यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांनंतर पोटे पाटील यांनी राणा यांच्या कार्यालयात भेट दिली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची मते निर्णायक मानली जातात. प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीला राणा गटाकडून छुपा विरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, या बैठकीनंतर राणा गट प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ उभा राहण्याचे संकेत मिळाले आहेत.

Women farmer status : राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा !

या मनोमिलनामुळे महायुतीची ताकद वाढल्याचे मानले जात असून, विरोधी महाविकास आघाडीच्या गोटातही या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

error: Content is protected !!