व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative Election : अमरावतीत काँग्रेस बॅकफूटवर; खासदार वानखडे यांच्या कार्यालयात वरिष्ठ नेत्यांचे...

Legislative Election : अमरावतीत काँग्रेस बॅकफूटवर; खासदार वानखडे यांच्या कार्यालयात वरिष्ठ नेत्यांचे मंथन

Candidate Harshjit Deshmukh missing from the campaign trail; speculation intensifies over support for Vanchit Bahujan Aghadi : उमेदवार हर्षजीत देशमुख प्रचारातून गायब; वंचितला पाठिंब्याच्या चर्चांना उधाण

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे अचानक प्रचारातून गायब झाल्याने राजकीय वर्तुळात, विशेषतः काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवारच संपर्काबाहेर झाल्याने काँग्रेस बॅकफूटवर आली असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी पक्षात तातडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दरम्यान, हर्षजीत देशमुख हे नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Legislative Election : हर्षजीत देशमुख आणि यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक युद्ध; पक्षांतर्गत वादाने राजकीय चर्चांना उधाण

काँग्रेसच्या या तातडीच्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली. बैठकीला खासदार बळवंत वानखडे, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि माजी महापौर विलास इंगोले उपस्थित होते.

बैठकीत उमेदवाराच्या अनुपस्थितीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. हर्षजीत देशमुख निवडणुकीच्या रिंगणातून पूर्णपणे बाहेर पडल्यास काँग्रेसने पुढे कोणती भूमिका घ्यावी, यावर गंभीर चर्चा झाली. पक्षाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी काँग्रेस ‘वंचित बहुजन आघाडी’च्या उमेदवाराला पाठिंबा देणार का, अथवा अन्य पर्याय स्वीकारणार, याबाबत स्थानिक नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

error: Content is protected !!